आरोग्यसेविकांच्या हस्ते कोरोना योध्दा अधिकार्‍यांचा सन्मान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, June 18, 2021

आरोग्यसेविकांच्या हस्ते कोरोना योध्दा अधिकार्‍यांचा सन्मान

 आरोग्यसेविकांच्या हस्ते कोरोना योध्दा अधिकार्‍यांचा सन्मान

अग्निपंख फाऊंडेशनचा अनोखा उपक्रम...


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः तालुक्यातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या अग्नीपंख फौंडेशनने कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत सामाजिक जाणीवेतून 15 कोविड सेंटर सुरू करुन 3 हजार 168 कोरोना बाधित रुग्णांना जीवदान देणार्‍या श्रीगोंदा तालुक्यातील कोविड सेंटर व स्वंयसेविकांचा सन्मान प्रशासकीय अधिकर्‍यांच्या हस्ते करण्यात आला.
आरोग्य विभागाचा अजेंडा  घरा घरात पोहोचविणार्‍या आरोग्यसेविकांच्या प्रतिनिधी म्हणून स्नेहल सोनटक्के, दिपाली शेलार, सुनंदा थोरात, गिता राऊत, निता शिंदे, सुरेखा चितळकर यांचे हस्ते अधिकार्‍यांचा सन्मान करण्यात आला. या अनोख्या उपक्रमाने आरोग्यसेविकांच्या डोळ्यातुन आनंदाचे अश्रू तरारळले.
यावेळी बोलताना पोलिस उपाधीक्षक आण्णासाहेब जाधव म्हणाले की माझ्या जीवनात मोठ्या माणसांकडून अनेक सत्कार झाले पण आरोग्य विभागात अतिशय प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणार्‍या आरोग्य सेविकेंच्या हस्ते माझा सन्मान झाला हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे. तर तहसीलदार प्रदिप पोलिस निरीक्षक रामराव ढिकले संपतराव शिंदे पालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे पवार बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा हेमंत नलगे सुनील गायकवाड प्रमोद म्हस्के यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा फुलसिंग मांडे यांनी केले  यावेळी गटविकास अधिकारी प्रशांत काळे अप्पर तहसीलदार चारुशीला पवार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ नितीन खामकर नागवडे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष युवराज चितळकर, योगेश भोयटे, सतीश मखरे, कल्याणी लोखंडे, दिलीप काटे, अंजली बगाडे , शिवदास शिंदे, मधुकर काळाणे, बी. बी. गोरे, किसन वर्‍हाडे आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here