लहुजी शक्ती सेनेच्या वतीने मातंगवीर कांबळे यांची जयंती रोपांचे वाटप करुन साजरी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 24, 2021

लहुजी शक्ती सेनेच्या वतीने मातंगवीर कांबळे यांची जयंती रोपांचे वाटप करुन साजरी

 लहुजी शक्ती सेनेच्या वतीने मातंगवीर कांबळे यांची जयंती रोपांचे वाटप करुन साजरी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः लहुजी शक्ती सेनेच्या वतीने मातंगवीर स्व. सोमनाथ कांबळे यांची जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली. सिध्दार्थनगर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन करुन कांबळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. तर उपस्थितांना कांबळे यांच्या स्मरणार्थ झाडे लावण्यासाठी रोपांचे वाटप करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल सकट, माजी नगरसेवक अनिल शेकटकर, गणेश ढोबळे, भगवान जगताप, सुनिल भोसले, सागर घोरपडे, अशोक भोसले, महेश भोसले, राजू गायकवाड, संजय मंडळीक, बाळकृष्ण जगधने, गणेश शेकटकर, विनोद घोरपडे, राजेंद्र उल्हारे आदी उपस्थित होते.
सुनिल सकट म्हणाले की, मातंगवीर स्व. सोमनाथ कांबळे यांनी मातंग समाजाची प्रश्न सोडविण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत कार्य केले. समाजाला एकत्र जोडून शासनस्तरावर न्याय, हक्क मिळवण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. त्यांच्या जाण्याने समाजाचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगितले. अनिल शेकटकर म्हणाले की, लहुजी शक्ती सेनेच्या माध्यमातून स्व. कांबळे राज्याचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्य करीत असताना सर्व समज घटकाला बरोबर घेऊन जाण्याचे त्यांनी कार्य केले. राजकारणापेक्षा त्यांनी समाजकारण पाहिले व दुबळ्या घटकांना आधार देण्याचे कार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment