सैनिक आणि समाज पार्टीच्या वतीने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 24, 2021

सैनिक आणि समाज पार्टीच्या वतीने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन साजरा

 सैनिक आणि समाज पार्टीच्या वतीने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन साजरा


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त सैनिक आणि समाज पार्टीच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिवाजी महाराजांचा जयघोष करुन राजकारणातील प्रस्थापितांची घराणेशाही संपविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी अ‍ॅड. शिवाजी डमाळे, मेजर भाऊसाहेब भुजबळ, माजी सुभेदार भाऊसाहेब आंधळे, राजेंद्र शिंदे, अ‍ॅड. बी.जी. गायकवाड, अ‍ॅड. संदीप डमाळे, दीपक वर्मा, अरुण खीची, ताराचंद जाधव आदी उपस्थित होते.
अ‍ॅड. शिवाजी डमाळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सैनिक आणि समाज पार्टीने राजकारणातील प्रस्थापितांची घराणेशाही मोडून काढण्याचा निर्धार केला आहे. 2024 मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकित हा पक्ष पुर्ण ताकतीने उतरणार आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये घराणेशाही विरोधात जागृती करण्याचे कार्य सुरु आहे. प्रस्थापित पैश्याच्या जीवावर भ्रष्ट मार्गाने सत्तेत आले असल्याचा आरोप करुन, खरी लोकशाही असतित्वात आनण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.  
संपूर्ण महाराष्ट्रात सैनिक आणि समाज पार्टीच्या वतीने हा सोहळा उत्साहात पार पडला. समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष बलबिरसिंह परमार यांनी वर्चुअलपणे कार्यक्रमास उपस्थिती दर्शवून उपस्थितांना मार्गदर्शन केले. परमार यांनी लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य व्यवस्था आणण्यासाठी सैनिक आणि समाज पार्टी प्रयत्नशील आहे. यासाठी समाजातील सज्जन, इमानदार व देशभक्त नागरिकांमधून उमेदवार निवडून आणण्याचे ठरविले आहे. प्रस्थापितांच्या घराणेशाहीला समाज वैतागला असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment