दुकानदार व नागरिकांकडून 6,63,700 रू दंड वसूल - आयुक्त - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 8, 2021

दुकानदार व नागरिकांकडून 6,63,700 रू दंड वसूल - आयुक्त

 दुकानदार व नागरिकांकडून 6,63,700 रू दंड वसूल - आयुक्त

कोरोना निर्बंधांचा भंग...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोना निर्बंधाची काटेकोरपणे कडक अंमलबजावणी साठी प्रभागनिहाय स्थापन केलेल्या दक्षता पथकांनी 16 मार्च ते 6 जून या काळात कोरोना नियम मोडणार्‍या 445 दुकाने व नागरिक यांचेवर 6,63,700 रुपयांची दंडात्मक कारवाई केली असल्याची माहिती मनपा आयुक्त शंकर गोरे व उपायुक्त यशवंत डांगे यांनी दिली.
महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी आयुक्त शंकर गोरे यांनी उपायुक्त यशवंत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग   समिती निहाय कोरोना दक्षता पथक स्थापन करून शशिकांत नजान, परिमल निकम, संतोष लांडगे, कल्याण बल्लाळ यांचेवर दक्षता पथक प्रमुख म्हणून जबाबदारी टाकली होती.
कोरोना महामारीच्या काळात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये,शहरातील नागरिक या आजारापासून सुरक्षित राहावेत त्यासाठी कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी व्हावी या हेतूने स्थापन झालेल्या पथकांनी आयुक्त, उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयाचे देखील काम केले असल्याचे दक्षता पथक क्र 2 चे शशिकांत नजन म्हणाले.
शहरातील भाजी बाजार ,मुख्य व उपनगर बाजारपेठा येथील कोरोना नियमावली कडक अंमलबजावणी साठी दक्षता पथक सहाय्यक सूर्यभान देवघडे, राहुल साबळे,नंदकुमार नेमाने, भास्कर आकुबत्तीन,राजेश आनंद,अमोल लहारे,किशोर जाधव, सहाय्यक आयुक्त दिनेश सिणारे , प्रभाग अधिकारी .नानासाहेब गोसावी,जितेंद्र सारसर, अंबादास सोनावणे, मार्केट विभाग प्रमुख रमेश वाळेकर,राहुल तनपुरे व अतिक्रमण विभाग कर्मचारी यांनी सहकार्य केले. तसेच शहर आणि उपनगर भागातील मुख्य चौक,भाजी बाजार येथील गर्दी नियंत्रण आणि कोरोना नियमावलीचे अंमलबजावणी साठी राजेंद्र बोरुडे ,विजय नवले,बापू बेलेकर, नंदकुमार रोहोकले, पोपटराव वायाळ कांगुडे सर, गणेश वरूटे, शहर पथक आणि पी.बी.आंबेकर, राजू गोरे, शैलेश दुबे, यु.आर. क्षीरसागर, एस.डी.जाधव, एस.एस.गायकवाड,आर.एस.साळवे, राहुल क्षीरसागर ,शुकलेश्वर जोशी,शिवाजी गुंजाळ,राजू रासकर,सुनील पारधे, अतिक्रमण पथक राहुल तनपुरे, तुकाराम कोतकर, सुभाष झारेकर, बाळासाहेब रोहोकले, दत्ता जाधव, विलास नरसाळे, किशोर शिंदे, रिजवाण शेख, अशोक रकटे, मच्छिद्रं कोर्हाळे.किशोर शिंदे आदींनी परिश्रम घेतले आहेत.

No comments:

Post a Comment