विरोलीला 65 लक्ष रुपयाचा निधी मंजूर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 19, 2021

विरोलीला 65 लक्ष रुपयाचा निधी मंजूर

 विरोलीला 65 लक्ष रुपयाचा निधी मंजूर

ग्रामस्थानी व्यक्त केले समाधान, कोवीड सेंटरला भेट देऊन आ. लंकेंचे मानले आभार


नगरी दवंडी/प्रतिनिधी
पारनेर ः पारनेर तालुक्यातील विरोली या छोटया खेडेगावासाठी आमदार निलेश लंके यानी मनाचा मोठेपणा दाखवुन तब्बल 65 लाख रुपयाचा निधी विकास कामासाठी दिल्याने विरोली ग्रामस्थानी आनंद उत्सव साजरा केला.
पारनेर कान्हूर पठार रोडवरील गणपती चौफुला विरोली हददी मध्ये सभागृह बांधण्या साठी 2515 शिर्षाअंतर्गत 50 लक्ष रुपये व श्री क्षेत्र पिंपळेश्वर मंदिर परीसर सुशोभीकरणासाठी 15 लक्ष रुपये निधी आमदार निलेश लंके यांच्या  खास प्रयत्नातुन मंजुर करण्यात आल्याने ग्रामस्था मध्ये समाधानाचे वातावरण आहे.
ग्रामस्थानी आमदार निलेश लंके यांनी भाळवणी येथे सुरू केलेल्या शरदचंद्र पवार अरोग्य मंदिर ( कोवीड सेंटर ) येथे भेट देऊन आमदार लंके यांचे आभार मानले .
यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार लंके म्हणाले की विकास कामेही निरंतर चालणारी प्रक्रिया आसुन यामध्ये आत्यावश्यक काम कोणते हेही पाहील पाहीजे विरोली हे गाव शांत आणि सयमी आसुन जेष्ठ किर्तनकार वै . हभप नाना महाराज वनकुटेकरांच्या संस्कारात वाढलेले गाव असल्याने या गावाला विकासासाठी निधी कमी पडणार नाही दर्जेदार काम होण्यावर आपला भर असणार आहे या पुढील काळातही विकास कामासाठी सढळ हाताने मदत करण्याचे आश्वासनही दिले .
यावेळी संजय मोरे , संजय मते , हनुमंत भागवत , पोपट रेपाळे , कचरू मते माजी उपसरपंच भिमाजी मते , माजी उपसरपंच रभाजी मते, बाबाजी गाडगे , बाबाजी मते , मिरचीचे व्यापारी बाळासाहेब भागवत , अनिल भागवत आदी विरोली ग्रामस्थ उपस्थित होते . तर निलेश लंके प्रतिष्ठाणचे उपाध्यक्ष बाळासाहेब खिलारी संदिप रोहोकले, सत्यम निमसे , दिपक मुळे जितेश सरडे , सचिन पठारे सुरज भुजबळ माजी पं.स . सदस्य राजेंद्र चौधरी  आदी मान्यवर उपस्थित होते .
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment