दोनशे दहा लाभार्थाना मिळणार बालसंगोपन योजनेचा लाभ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 19, 2021

दोनशे दहा लाभार्थाना मिळणार बालसंगोपन योजनेचा लाभ

 दोनशे दहा लाभार्थाना मिळणार बालसंगोपन योजनेचा लाभ

पंचायत समिती उपसभापती डॉ. दिलीप पवार याच्या प्रयत्नाला यश


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः बालसंगोपन योजनेसाठी अर्ज केलेल्या नगर तालुक्यातील दोनशे दहा लाभार्थ्यांना  बालसंगोपन योजनेचा लाभ मिळणार असल्या न मिळालेला नाही. या योजनेचा लाभ देण्याचा आदेश निघाला असल्याचे  पंचायत समिती उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी सांगितले. या बाबतचे पत्र जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस.जी. पाटील यानी दिले आहे.
नगर तालुक्यातील एक पालक, अनाथ मुलांनी बालसंगोपन योजनेचा लाभ मिळणेसाठी जानेवारी 2020 पासून जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांचेकडे अर्ज सादर केलेले आहेत. परंतु, अदयापपर्यंत एकाही लाभार्थ्यास बालसंगोपन योजनेचा लाभ या कार्यालयाकडुन देण्यात आलेला नाही. सदर कार्यालयाच्या अनास्थेमुळे आज नगर तालुक्यातील अंदाजे दोनशे ते अडीचशे बालके लाभापासुन वंचित आहेत. या योजनेच लाभ मिळावा अन्यथा उपोषन केले जाईल असा इशारा शिवसेनेचे माजी उपतालुका प्रमुख तथा पंचायत समिती उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी दिला होता. उपोषनासाठी । जिल्हा परीषद सदस्य संदेश कार्ले, सभापती संदिप गुंड, उपसभापती डॉ. दिलीप पवार, नगरसेवक योगीराज गाडे गेले असता जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस.जी. पाटील व संध्या राशीनकर यानी या लाभार्थाना या योजनेचा लाभ देण्याचा आदेश परित झाला आहे. शासनाकडून अनुदान उपलब्ध होताच खात्यावर जमा करण्यात येईल असे लेखी आदेश. दिल्यामुळे उपोषन स्थगित करण्यात करण्यात आले.

अहमदनगर बालकांची संख्या बालसंगोपन योजनेतंर्गत नगर तालुक्यातील दाखल आदेश दिलेल्या बालकांची गावनिहाय संख्या गावाचे नावे - नगर शहर (99), रांजणगाव खुर्द (02), भिंगार (04), निंबोडी (01) जेऊर (02), निंबळक (13), वडगाव गुप्ता (09), मेहकरी (01) नवनागापूर (18), रुई छत्तीसी (04), शेंडी (01), चिंचोडी पाटील (15), बोल्हेगाव (12), अकोळनेर (02), आठवड (02), शिगवे नाईक (03), देवगाव (02),निमगाव घाणा (02), पिंपळगाव वाघा (01), विळद (05),चास (02), राळेगण म्हसोबा (02), सारोळा कासार (02), अरणगाव (02), माळवाडी तांदळी (01), पिंपळगाव माळवी (02), मठ पिंपरी (01)

No comments:

Post a Comment