जनजीवन सुरळीत. बाजारपेठेत गर्दी; सकाळी 8 लाचं शटर ओपन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, June 7, 2021

जनजीवन सुरळीत. बाजारपेठेत गर्दी; सकाळी 8 लाचं शटर ओपन.

 जनजीवन सुरळीत.

बाजारपेठेत गर्दी; सकाळी 8 लाचं शटर ओपन.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः लॉकडाउन... अनलॉक... या दोन शब्दांभोवती गेल्या अडीच महिन्यांपासून ‘कोरोना’नं विस्कळीत केलेलं नगरकरांचं जनजीवन आजपासून सुरळीत झालं असून शहरातील सर्वच प्रभागातील बाजारपेठेतील दुकानांची शटर सकाळी 8 वाजताच उघडली असून गेल्या 64 दिवसांचा शुकशुकाटामुळे संपूर्ण बाजारपेठेत मोठी गर्दी दिसून येत आहे. चहाच्या टपर्‍यांपासून ते हॉटेल्स, स्टेशनरी, सलून, हार्डवेअर, मोबाईल, भाजीविक्रेते, इलेक्ट्रॉनिक्स,सलुन दुकानदारांच्या चेहर्‍यावरील तणाव कमी झाला असून असं कोरोनाचं संकट पुन्हा येऊ नये ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अहमदनगर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांपेक्षा कमी आल्याने आजपासून नगर जिल्हा अनलॉक झाल्याचा मोठा दिलासा नगरकरांना मिळाला आहे. शहरातील, मॉल, व्यापार पेठा, हॉटेल, रेस्टॉरंट, क्रीडा मैदान, समारंभ आता सुरू राहणार आहेत. मंदिर, मशीद, गुरुद्वार, चर्च, विहार मात्र बंद राहणार आहेत.
राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार नगर जिल्हा पॉझिटिव्हिटी रेट कमी असला, तरी नगरकरांना सोशल डिस्टंसिंगचा वापर करून कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात ठेवावी लागणार आहे. पॉझिटिव्हिटी रेट वाढल्यास असे निर्बंध पुन्हा लागू शकतात यासाठी सावधानता बाळगावी लागणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या आनंदात लॉकडाउन संपुष्टात आल्याने अधिकच भर पडली आहे. आज सकाळी 8 वाजता शहरातील व्यापार्‍यांनी दुकानांची शटर उघडून दुकानांची साफसफाई सुरू केली. दहा वाजल्यापासून दुकानात ग्राहक खरेदीसाठी गर्दी करू लागले. ज्या ग्राहकांच्या चेहर्‍यांवर मास्क नसेल त्यांना मास्क लावण्याच्या सूचना देताना दुकानदार दिसून आले.

अचानक पणे शासनाने निर्बंध लावल्याने व्यापार्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे शहरातील बाजारपेठेवर अवलंबून राहणार्‍या 26 हजारांच्यावर कर्मचार्‍यांची लॉकडाउनमुळे हाल झाले आहेत. आता यातून सावरावे लागणार आहे. आता कोरोना प्रतिबंधात्मक गाईडलाईनचे काटेकोरपणे पालन केले जाईल ग्राहकांना दुकानात गर्दी करू दिली जाणार नाही. गर्दी टाळण्यासाठी व्यापारी प्रयत्न करतील. - राहुल मुथा, संचालक व्यापारी असोसिएशन.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here