नगर शहरामध्ये हरित वनराई निर्माण व्हावी - पद्मश्री पोपटराव पवार - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, June 9, 2021

नगर शहरामध्ये हरित वनराई निर्माण व्हावी - पद्मश्री पोपटराव पवार

 नगर शहरामध्ये हरित वनराई निर्माण व्हावी - पद्मश्री पोपटराव पवार

लोंढे मळा येथे मा.नगरसेवक पै.संभाजी लोंढे यांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः प्रत्येक व्यक्तीने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून संवर्धनाची खरी गरज आहे.शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहे,यासाठी शहरांमध्ये हरित वनराईचे पट्टे निर्माण करण्याची गरज आहे. पर्यावरणाच्या असमतोलामुळे भूतलावर दिवसेंदिवस बदल होताना दिसत आहे,त्यामुळे मानवी जीवनावर वेगवेगळ्या आपत्ती येत आहेत. समाजामध्ये वृक्षारोपण व संवर्धनाची लोकचळवळ निर्माण व्हावी या माध्यमातून जनजागृती होण्यास मदत होईल असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.
कल्याण रोड वरील लोंढे मळा येथे मा.नगरसेवक पै.संभाजी लोंढे यांच्या संकल्पनेतून विविध प्रकाराच्या झाडांचे वृक्षारोपण करताना पद्मश्री पोपटराव पवार व मा.मंत्री शिवाजीराव कर्डिले समवेत आ.संग्राम जगताप, लक्ष्मीबाई लोंढे, माधुरी लोंढे, वृषाली लोंढे, मा. जिल्हा परिषद सदस्य अरुण होळकर, मुकुंद पाथरकर, संजय सुपेकर, गोविंद शिंदे, बाळासाहेब नलगे, रंजना नन्नवरे, ज्योती सुपेकर, अरुणा वागस्कर, रमेश लोखंडे, पुष्पा केळगंद्रे आदी उपस्थित होते.
माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले की,लोंढे परिवार हा नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. मा.नगरसेवक पै.संभाजी लोंढे यांनी वृक्षारोपण व संवर्धन याची चळवळ हाती घेऊन एक सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले आहे. कल्याण रोड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करावे जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना आ.संग्राम जगताप म्हणाले की,कल्याण रोड हे नगर शहराचे एक उपनगर आहे.या भागाचा झपाट्याने या भागाचा विकास होत आहे.यासाठी प्रत्येक नागरिकांनी पुढे येऊन वृक्षारोपण व संवर्धन करावे भविष्यकाळातील पर्यावरणाबाबत होणारे धोके टाळण्यासाठी वृक्षसंवर्धन चळवळ राबवणे हीच खरी काळाची गरज.मा.नगरसेवक पै.संभाजी लोंढे यांनी वृक्षारोपणासाठी घेतलेला पुढाकार भविष्य काळामध्ये या वृक्षारोपणाने लोंढे नगर हे हरित नगर म्हणून ओळखले जाईल असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here