बिबट्याच्या हल्ल्यात घोडीचा बळी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, June 9, 2021

बिबट्याच्या हल्ल्यात घोडीचा बळी

 बिबट्याच्या हल्ल्यात घोडीचा बळी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः  मुळा धरणाच्या पायथ्याशी मुळानदीच्या कडेला असणार्‍या मेंढपाळाच्या कळपात बिबट्याने हल्ला करून घोडीच्या नरडीचा घोट घेतल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली . सुदैवाने याठिकाणी मेंढ्या आणि कोणत्याही व्यक्तींवर बिबट्याने हल्ला केला नाही . मुळा धरणाच्या पायथ्याशी नदीच्या कडेला एका शेतामध्ये लक्ष्मण गंगाराम चंद या मेंढपाळाने आपल्या मेंढ्या व एक घोडा , घोडी असे पाल टाकून राखल्या आहेत . पावसाचे दिवस असल्याने मेंढपाळ चंद यांनी खबरदारी देखील घेतली . मात्र या परिसरात तीन ते चार वर्षाचा बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. अशातच आज पहाटे चंद यांच्या पालावर अचानक बिबट्याने अंदाजे 4 - 5 वर्षाच्या घोडीवर हल्ला करीत तिच्या नरडीचा घोट घेतला. बिबट्याच्या हल्ल्यात ही घोडी ठार झाली. लक्ष्मण चंद व परिसरातील ग्रामस्थांनी राहुरीच्या वनविभाग अधिकार्‍यांशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली. वन अधिकार्‍यांनी या घटनेचा पंचनामा केला.

No comments:

Post a Comment