‘आनंदऋषीजी’मध्ये थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांसाठी 12 ते 14 जून दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 11, 2021

‘आनंदऋषीजी’मध्ये थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांसाठी 12 ते 14 जून दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन

 ‘आनंदऋषीजी’मध्ये थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांसाठी 12 ते 14 जून दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः
करोनाकाळात नगर जिल्ह्यात रक्त तुटवडा निर्माण झाला आहे. याचा थेट परिणाम थॅलेसेमियाग्रस्त रूग्णांवर झालेला आहे. या रूग्णांना नियमित रक्ताची गरज असल्याने आनंदऋषीजी हॉस्पिटलसंचलित आनंदऋषीजी ब्लड सेंटर व आनंदऋषीजी थॅलेसेमिया डे केअर सेंटर येथे दि.12 ते 14 जून या कालावधीत विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. थॅलेसेमियाग्रस्त रूग्ण व त्यांच्या पालकांनीच या शिबिरासाठी पुढाकार घेतला आहे.
थॅलेसेमियाग्रस्तांसाठी आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र डे केअर सेंटर कार्यान्वीत झाले असून याठिकाणी या रूग्णांवर उपचार केले जात आहेत. सध्या सर्वत्रच रक्त तुटवडा जाणवत असल्याने या रूग्णांवर उपचार करताना अडचणी येत आहेत. यासाठी थॅलेसेमिया योध्द्यांनी पुढाकार घेत रक्तदानासाठी समाजाला आवाहन केले आहे. सलग तीन दिवस सकाळी 8 ते सायंकाळी 6 या कालावधीत रक्तदान शिबीर होणार आहे. यात प्रत्येकाने स्वत:बरोबरच किमान 5 रक्तदाते घेवून यावेत व रक्तदानाचे पुण्यकर्म करावे. नगरकरांनी दुसर्याचे प्राण वाचवणार्या रक्तदानाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. या शिबिरालाही मोठा प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिरावेळी सोशल डिस्टन्सिंग तसेच करोना प्रतिबंध नियमावलीचे संपूर्ण पालन करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क 02412320472


No comments:

Post a Comment