गोदावरी अकॅडमी आर्मी पोलिसमध्ये 100 मुलांना मोफत भरती करणार : खांदवे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 11, 2021

गोदावरी अकॅडमी आर्मी पोलिसमध्ये 100 मुलांना मोफत भरती करणार : खांदवे

 गोदावरी अकॅडमी आर्मी पोलिसमध्ये 100 मुलांना मोफत भरती करणार : खांदवे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः सर्व जाती धर्माच्या 100 मुलांमुलींस सैन्य व पोलिसात भरती होण्यासाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यांच्या नोकरीची संपूर्ण जबाबदारी संस्था घेईल अशी माहिती गोदावरी अकॅडमी चे अध्यक्ष बाजीराव खांदवे यांनी दिली.
राज्यातील 17 ते 20 वयोगटातील विद्यार्थी या मध्ये सहभागी होऊ  शकतात . मेडिकल पास झाल्यानंतर च प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जाईल, मेडिकल 15 जूनपासून सुरू होईल त्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे. हे प्रशिक्षण 1 जुलै पासून भरतीपर्यंत चालेल, या वर्षी परीक्षा दिलेले 10 व 12   वी चे विद्यार्थी पण सहभागी होऊ शकतात, मेडिकल साठी निकाल जाहीर होण्याअगोदर च नावनोंदणी करू शकता त्यासाठी 9822107650 या व्हाट्सएप नंबरवर आपले नाव पूर्ण पत्ता,पासपोर्ट फोटो, आधारकार्ड कॉपी पाठवावी त्यावरच पुढील माहिती पाठवण्यात येईल.
गोदावरी अकॅडमी ही राज्यातील पहिली अकॅडमी आहे 2000 साली सुरू झालेल्या अकॅडमी मधून आजपर्यंत हजारो विद्यार्थी सैन्य व पोलिसात भरती झाले आहेत.
कोरोनाच्या महामारी मध्ये गरीब गरजू विद्यार्थ्यांना मदत म्हणून हे मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, भरतीसाठी प्रवेश देणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना भरतीची हमी देण्यात येणार आहे, मात्र त्यासाठी भरती होइपर्यंत अकॅडमी करणे बंधनकारक आहे, असेही खांदवे यांनी या वेळी सांगितले. या बरोबरच आर्मी क्लार्क/टेक्निकल/नर्सिंग/ नेव्ही --/डडठ/चठ व एअरफोर्स टेक्निकल द व नॉन टेक्निकल ध ग्रुप साठीही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या भरत्या वर्षातून दोन वेळा होतात, तसेच हे प्रशिक्षण सुरू असताना विद्यार्थी आपले पुढील शिक्षण सुरू ठेऊ शकतात.

No comments:

Post a Comment