पोलीसाकडुन शरीर सुखाची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, June 3, 2021

पोलीसाकडुन शरीर सुखाची मागणी

 पोलीसाकडुन शरीर सुखाची मागणी 

महिलेची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे तक्रार.

अकोला ग्रामस्थांची पोलीस कर्मचार्‍याच्या निलंबनाची मागणी.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आरोपींना पाठीशी घालून, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत असल्याचा इतर तक्रारदारांचा आरोप अकोले तालुक्यातील एका पोलीस कर्मचार्‍याच्या जाचास कंटाळून तक्रारदार ग्रामस्थ व महिलेने पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले. सदर पोलीस कर्मचारी आरोपींना पाठीशी घालून खोटे गुन्हे दाखल करीत आहे. तर महिलेने शरीर सुखाची मागणी होत असल्याचा धक्कादायक आरोप सदर पोलीस कर्मचार्‍याच्या विरोधात केला आहे. या पोलीस कर्मचारीचे तात्काळ निलंबन करण्याच्या मागणीचे निवेदन तक्रारदार महिला व ग्रामस्थांनी अप्पर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल यांना दिले.
सुरेखा मंडलिक यांनी तक्रार अर्जात म्हंटले आहे की, मी विधवा असून, दीराबरोवर जमीनीचे वाद सुरु आहे. या घरगुती त्रासाबद्दल पोलीस स्टेशनला तक्रार केली होती. तक्रारीच्या तपासकामी अकोले पोलीस स्टेशनचे कर्मचारी सचिन रमेश शिंदे याने माझ्याशी ओळख वाढवून एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन सुरु केले आहे. तर सातत्याने शरीर सुखाची मागणी करत आहे. सदर पोलीसाने माझी बदनामी सुरु केली असून, खोटे गुन्हे दाखल केले आहे. या पोलीस कर्मचारीमुळे माझे व मुलाचे जगणे अवघड झाले असून, तो मला आत्महत्येस प्रवृत्त करीत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. एका अल्पवयीन मुलीला सोन्याबापू कासार याने दारुच्या नशेत घरात घुसून अतीप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्या विरोधात अकोले पोलीस स्टेशनला बालकांचे लैगींक अधिनियम 2012  अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपीचे पोलीस कर्मचारी शिंदे याच्याशी हितसबंध असल्याने त्याला अद्यापि अटक करण्यात आलेली नाही. आरोपी सर्रासपणे पिडीत मुलीच्या घराजवळ येऊन त्रास देत आहे. गणेश धुमाळ यांनी माझा भाऊ संदिप धुमाळ याला जबर मारहाण करण्यात आली. यामध्ये संदिप याच्या पाठीच्या मणक्यास गंभीर मार लागला आहे. त्याच्यावर नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. सदर गुन्ह्यात आरोपींना पाठिशी घालण्यात आले आहे. या गुन्ह्यात आरोपींवर 307 व 397 कलमान्वये गुन्हे दाखल होणे अपेक्षित असताना, हे कलम त्यांच्यावर लावण्यात आले नाही. यामुळे आरोपी जामीनावर सुटून आमच्या कुटुंबीयांना धमकावत आहे. या प्रकरणात देखील शिंदे पोलीस कर्मचारी आरोपींना सहकार्य करीत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हंटले आहे. जनार्दन नवले याने माझा बांधकाम व्यवसाय असून, शिंदे पोलीस कर्मचारी पैश्याची मागणी करीत आहे. अन्यथा खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. चारही तक्रारदरांचे अकोले पोलीस स्टेशनचे कर्मचारी सचिन रमेश शिंदे यांच्या विरोधात गंभीर आरोप असून, सदर पोलीस कर्मचारीची चौकशी करुन त्याचे निलंबन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी सुरेखा मंडलिक, देवराम भोकनळ, गणेश धुमाळ, जनार्दन नवले (सर्व रा. धामणगाव रोड, अकोले) आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here