सराईत गुन्हेगार तलवारीसह अटक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 5, 2021

सराईत गुन्हेगार तलवारीसह अटक

 सराईत गुन्हेगार तलवारीसह अटक

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनची कामगिरी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.संजय सानप यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम औदयोगिक वसाहत परीसरात हातात धारधार तलवार घेवुन फिरत आहे अशी बातमी मिळाल्याने पोलीस सदर इसमाचा शोध घेण्यासाठी औदयोगिक वसाहत परीसरात गेले असता सदर ठिकाणी एक इसम समोरुन हातात तलवार घेवुन येतांना दिसला त्यावेळी त्याला थांबण्याचा इशारा केला असता तो पळुन जावु लागला त्यावेळी पोलीसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला शिताफिने पकडले. व त्याला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव दिपक बबन जाधव रा. सुभाष कॉलनी वार्ड नं.6 श्रीरामपूर असे सांगीतले.पंचासमक्ष त्याची झडती घेतली असता त्याचे कब्जात एक धारधार तलवार मिळुन आली त्यावरुन श्रीरामपूर शहर पोस्टेला पोकॉ/2210 पंकज विजय गोसावी यांचे फिर्यादीवरुन गुन्हा रजि नं. ॥ 344/2021 भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदरचा आरोपी हा सराईत असुन त्याचेवर खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
1) श्रीरामपूर शहर पोस्टे गु.रजि.नं. 1 63/2015 भादवि कलम 379,411,34 प्रमाणे.2) श्रीरामपूर शहर पोस्टे गु.रजि.नं. 1 276/2013 भादवि कलम 461,380 प्रमाणे.3) राहुरी पोस्टे गु.रजि.नं. 1 282/2019 भादवि कलम 399,402 प्रमाणे,4) श्रीरामपूर शहर पोस्टे गु.रजि.नं. 1 2116/2020 भादवि कलम 392,34 प्रमाणे.5) श्रीरामपूर शहर पोस्टे गु.रजि.नं. ॥ 59/2017 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 प्रमाणे.6) श्रीरामपूर शहर पोस्टे गु.रजि.नं. ॥ 80/2017 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 प्रमाणे.7) श्रीरामपूर शहर पोस्टे गु.रजि.नं. ॥ 326/2018 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 प्रमाणे.8) श्रीरामपूर शहर पोस्टे गु.रजि.नं. ॥ 82/2019 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 प्रमाणे.सदरची कारवाई श्री.मनोज पाटील सो.पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्रीमती दिपाली काळे मॅडम अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, श्री. संदीप मिटके सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर,श्री. पोनि संजय सानप पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोस्टे, यांचे मार्गदर्शनाखाली पोहकॉ/साळवी, पोना/ कोरडे, पोना/करमल, पोकॉ/पंकज गोसावी, पोकॉ/महेंद्र पवार, पोकॉ/ सुनिल दिघे, पोकॉ/किशोर जाधव, पोकॉ/राहुल नरवडे, तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोना/फुरकान शेख यांचे पथकाने केली.

No comments:

Post a Comment