तारकपुर येथील सेंट सेव्हिअरर्स कॅथड्रलमध्ये नलिनीआई प्रार्थना गृहाची पुनस्थापना - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, June 5, 2021

तारकपुर येथील सेंट सेव्हिअरर्स कॅथड्रलमध्ये नलिनीआई प्रार्थना गृहाची पुनस्थापना

 तारकपुर येथील सेंट सेव्हिअरर्स कॅथड्रलमध्ये नलिनीआई प्रार्थना गृहाची पुनस्थापना


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर शहरातील तारकपुर भागातील सेंट सेव्हिअर्स कॅथेड्रल येथे नलिनीआई प्रार्थना गृहाची पुनस्थापना नाशिक धर्मप्रांताचे बिशप रा.रेव्ह.शरद गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी त्यांच्या पत्नी रेव्ह.मेघा गायकवाड, रेव्ह.डि.डि.सोनावणे, रेव्ह.सतीश तोरणे, रेव्ह.तिवारी रेव्ह.फिलिप व्हरा, रेव्ह.रवी चांदेकर, रेव्ह.येशूदास पंडित, रेव्ह.वाघमारे, रेव्ह.शिंदे, तसेच कॅथेड्रल पास्टोरेट कमिटी, महिला मंडळ पदाधिकारी, तरुण संघ, तारकपूर भजनी मंडळ, निवृत्त शाळा प्रिन्सिपॉल हे उपस्थित होते.सर्व सभासदांनी या प्रार्थना गृहात येऊन वैयक्तिक, कौटुंबिक, चर्च, धर्मप्रांत व कोरोना बाधित रुग्णांकरिता देखील प्रार्थना करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी सांगण्यात आले की, प्रार्थना गृह रविवार ते शनिवार सकाळी 7: 00 वाजेपासून ते सायं.6: 00 वाजेपर्यंत सर्व सदस्यांसाठी उघडे राहणार आहे. या वेळात नियमांचे पालन करुन वैयक्तिक प्रार्थना करू शकता अथवा रेव्ह.सतीश तोरणे  94201- 80130, रेव्ह.रवी चांदेकर 98901-50257 या नंबर देखील प्रार्थना विनंती करता येईल, याची सर्व सदस्यांनी नोंद घ्यावी असे म्हंटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here