साडेचार वर्षे झोपा काढल्यानंतर विरोधकांना निवडणुकीचा वास - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 11, 2021

साडेचार वर्षे झोपा काढल्यानंतर विरोधकांना निवडणुकीचा वास

 साडेचार वर्षे झोपा काढल्यानंतर विरोधकांना निवडणुकीचा वास

राहुरी - साडेचार वर्षे झोपा काढल्यानंतर विरोधकांना निवडणुकीचा वास आला आहे . राहुरी नगरपरिषदेचा कारभार सुस्थितीत सुरू आहे . राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वामध्ये कोरोना विरोधातील लढाईमध्ये जनसेवा मंडळाचे सर्व कार्यकर्ते कार्यरत होते .त्याउलट विरोधी गट घरात झोपून राहिले. लसीकरण करणे व रेमडेसिवीरचा फरक न समजणारे विरोधी नगरसेवकांचे आरोप हास्यास्पद आहे.असा पलटवार सत्ताधारी गटाच्या वतीने करण्यात आला आहे.
पालिकेच्या सभागृहात सत्ताधारी गटाने पत्रकाराना माहिती दिली.गैरव्यवहाराच्या आरोपांवर जनतेमध्ये हसू करून घेणार्‍या विरोधकांचे मनसुबे हे केवळ निवडणुकांसाठी असल्याने त्यांचे नाटकी आंदोलन हे दिखावा असल्याची टीका राहुरी नगरपरिषदेतील सत्ताधारी गटाने केली आहे. विरोधकांनी केलेल्या आरोपाबाबत सत्ताधारी गटाकडून खुलासा करण्यात यावेळी नगराध्यक्ष अनिल कासार व उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी यांनी सांगितले की, साडेचार वर्षांपासून आम्ही सत्तेमध्ये काम करीत आहोत.निवडणुका आल्यानंतरच विरोधकांना चुकीचे काम दिसू लागले आहे . तोपर्यंत सर्व विरोधी नगरसेवक घरात बसून सर्व काही अलबेल असल्याचे दाखवित होते.कोरोनाच्या काळामध्ये राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नियोजनाचा आदर्श जिल्ह्यात घेण्यात आला . सगळीकडे लसीकरणाबाबत बोंबाबोंब असताना राहुरी तालुक्यात सर्वत्र शांततेत लसीकरण सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी राहुरी नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष अनिल कासार , उपनगराध्यक्ष सुर्यकांत भुजाडी , नगरसेवक नंदकुमार तनपुरे ,अशोक आहेर, बाळासाहेब उंडे, गजानन सातभाई, प्रकाश भुजाडी, संजय साळवे, संतोष आघाव, महेश उदावंत आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment