काँग्रेस पक्षाची बदनामी करणार्‍या त्या बातमीदाराविरोधात गुन्हा दाखल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 12, 2021

काँग्रेस पक्षाची बदनामी करणार्‍या त्या बातमीदाराविरोधात गुन्हा दाखल

 काँग्रेस पक्षाची बदनामी करणार्‍या त्या बातमीदाराविरोधात गुन्हा दाखल


नगरी दवंडी/प्रतिनिधी
नेवासा ः नेवासा  :- अज्ञात बातमीदाराने काँग्रेस पक्षाची बदनामी होईल अशा प्रकारचे लिखाण करून , बदनामीकारक मजकूराची  बातमी तयार करून ती पेपरला न देता व्हाट्सएपच्या ,फेसबुक या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल केली, नियोजनबध्दरीत्या प्रसिद्ध केली,नेवासा काँग्रेसने केलेल्या तक्रारीमुळे शुक्रवारी नेवासा पोलीस ठाण्यात त्या झोल बातमीदारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
वडाळा बहिरोबा ता. नेवासा  याठिकाणी रेमडीसीविर काळाबाजार विक्री प्रकरणी आरोपींना तातडीने जेरबंद करून याची सखोल चौकशी करून रुग्णांना भरपाई मिळून देण्यासाठी, न्याय मिळवून देण्यासाठी नेवासा काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यासमोर चार तास धरणे आंदोलन दिले , आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले होते, शिवाय त्वरित अटक न केल्यास 10 तारखेला वडाळा बहिरोबा येथे नगर - औरंगाबाद महामार्गावर रस्ता रोको करण्याचा इशाराही दिला होता. याची दखल घेत शनिशिंगणापूर पोलिसांनी कारवाई करत डॉक्टरसह , इतर आरोपींना अटक केली, यामुळे नेवासा काँग्रेसने नियोजित रस्ता- रोको आंदोलनास स्थगिती दिली.
परंतु अज्ञात बातमीदाराने खोडसाळपणा करत नेवासा काँग्रेस पक्षाने शनिशिंगणापूर पोलिसांशी हातमिळवणी करून मोठ्या रकमेची तडजोड करून आंदोलन मागे घेतले अशा आशयाची बातमी ’काँग्रेस पक्षाने भाड खाल्ली’ या शिर्षकाखाली प्रसिद्ध केली. यामुळे पोलिसांसह काँग्रेस पक्षाची बदनामी झाल्याने नेवासा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी माळवदे व काँग्रेस कमिटीचे सदस्य यांनी नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय करे यांची भेट घेऊन अज्ञात बातमीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याची दखल घेऊन शुक्रवारी दुपारी माळवदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार खोडसाळ बातमीदारा विरोधात ठाणे अंमलदार पोलिस नाईक कानडे यांनी पनाका. रजी. न. 521/2021 भादवी 500 गुन्हा दाखल करून घेतला .
यावेळी सदर गुन्ह्याचा तपास तातडीने करून खोडसाळ बातमीदारावर त्वरित कारवाई करण्याची मागणी काँग्रेस कमिटीने केली.

तालुक्यातील जनतेच्या प्रश्नासाठी ,न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाने नेहमीच आक्रमक भूमिका घेवून ते सोडविण्याचा प्रयत्न केला, बातम्या टाकून किंवा ईतर कितीही खोडसाळपणा करून आमच्या कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी लोकांसाठी आम्ही तत्पर राहून कार्य करीतच राहणार  
- संभाजीराजे माळवदे,
- अध्यक्ष नेवासा तालुका काँग्रेस कमिटी.

No comments:

Post a Comment