वंचिताची सेवा करणे हिच ईश्वरसेवा स्नेह 75 चे विश्वनाथ पोंदे यांचे प्रतिपादन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, June 12, 2021

वंचिताची सेवा करणे हिच ईश्वरसेवा स्नेह 75 चे विश्वनाथ पोंदे यांचे प्रतिपादन

 वंचिताची सेवा करणे हिच ईश्वरसेवा स्नेह 75 चे विश्वनाथ पोंदे यांचे प्रतिपादन

स्नेह 75च्या वर्धापनदिनानिमित्त मातोश्री वृध्दाश्रमातील वृध्दाचे आरोग्यतपासणी, औषधे, किराणा व फळाचे वाटप


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः समाजातील दुर्बलांना जगण्याचे बळ मातोश्री वृध्दाश्रम  देत आहे.त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येत आहेत.अश्या या कार्यात हातभार लावण्याचे काम आम्ही स्नेह 75 चा ग्रुप करत आहे. भारतीय संस्कृतीत दानाला अनन्यसाधारण महत्व आहे वंचिताची सेवा करणे हिच ईश्वरसेवा आहे असे प्रतिपादन स्नेह 75 चे  विश्वनाथ पोंदे यांनी केले.
स्नेह 75 च्या 16 व्या वर्धापनदिनानिमित्त मातोश्री वृध्दाश्रमातील वृध्दाचे आरोग्यतपासणी,त्यांना औषधे तसेच किराणा व फळाचे वाटप करण्यात आले. यावेळी विश्वनाथ पोंदे, देवेंद्र डावरे , डॉ. प्रविण रानडे, डॉ. विनोद सोलंकी, ईश्वर सुराणा, दिनेश गुगळे, अजित चाबुकस्वार, सुनिल ढोरजे, रजनी ढोरजे, जयश्री डावरे,मातोश्री वृध्दाश्रमाचे व्यवस्थापक महावीर जैन आदी उपस्थित होते.जागतिक पर्यावरण दिनानिमित ईश्वर सुराणाच्या हस्ते वृध्दाश्रम परीसरात व़ृक्षारोपण करण्यात आले.
ईश्वर सुराणा म्हणाले की, निसर्ग व पर्यावरणाचा र्‍हास होत असल्याने पर्यावरण संर्वधनाकरीता प्रत्येकाने एकतरी झाड लावले पाहीजे व जगविले पाहीजे.तसेच इतरांनी झाडे लावावी याकरीता प्रेरीत केले पाहीजे.
महावीर जैन म्हणाले की,माणुसकीच्या भावनेने मानवसेवचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून स्नेह 75 सारख्या सामाजिक ग्रुपमुळेच समाज सावरला आहे.आम्ही करत असलेल्या या कामाला समाजातील  अनेकांचे हात लागत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here