अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करा ! पोलीस अधीक्षकांचे पोलीस ठाण्यांना निर्देश.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 17, 2021

अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करा ! पोलीस अधीक्षकांचे पोलीस ठाण्यांना निर्देश..

 अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करा ! पोलीस अधीक्षकांचे पोलीस ठाण्यांना निर्देश..

वाळू चोरी, खून, दरोडे, चंदन, गुटखा, दारू विक्रीच्या वाढलेल्या गुन्ह्यांची पोलीस अधीक्षकांकडून दखल.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जिल्ह्यात चोर्‍या, दरोडे, हत्या, गावठी दारू, मावा, गुटखा विक्री ,चंदन तस्करी, अवैध वाळू उत्खनन इत्यादी अनैतिक व्यवसायात वाढ झाल्याची दखल जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी घेतली असून अवैध धंद्यावर कठोर कारवाई करा अन्यथा ठाण्याच्या प्रभारींना जबाबदार धरण्याचा इशारा दिला आहे.पारनेर मधील पॅरोलवरील आरोपीची हत्या, नेवासा तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यावर गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडून हल्ला, मध्यप्रदेशातील दरोडेखोरांची कार्यरत टोळी अशा अनेक घटनांमधून पोलीस प्रशासनाबद्दलची भीती संपल्याचे संकेत मिळत आहेत. त्याची दखल जिल्हा पोलिस अधीक्षकांनी घेतली असल्याचे दिसून येत आहे. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करा, अन्यथा मी पाठविलेल्या पथकाकडून कारवाई झाल्यास संबंधीत ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांना जबाबदार धरण्यात येईल, अशा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांना दिला आहे.
अधीक्षक पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांची बैठक घेतली. यावेळी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे सर्व व्यवहार ठप्प होते. गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात सर्व उद्योग-धंदे सुरू झाले आहेत. लॉकडाऊन काळात कमी अधिक प्रमाणात सुरू असलेल्या अवैध धंद्यांनी उचल खाल्ली आहे. नदीपात्रातून सर्रास वाळू उपसा सुरू आहे. याला महसूलसह पोलिसांचे पाठबळ मिळत आहे, असे आरोप होत आहे. वाळू वाहतूक सुरू ठेवण्यासाठी पोलिसांनी हप्ते मागितले आहे. या हप्तेखोरीतून अनेक पोलीस कर्मचार्यांवर लाचलुचपत विभागाकडून कारवाई झाली आहे. यामुळे पोलीस दलाची बदनामी होत आहे. अवैध दारू विक्री, मावा, गुटखा विक्री, चंदनतस्करी जिल्ह्यात सुरू झाली आहे. गावठी कट्ट्यांचा वापर करून गुन्हेगारीत वाढ होत आहे. या सर्व घटनांचा आढावा घेत अधीक्षक पाटील यांनी अवैध धंद्यांचा बिमोड करण्याचा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. छापेमारी करून अवैध धंद्यावर कारवाई कराव्यात, अन्यथा माझे पथकाने एखाद्या पोलीस ठाणे हद्दीत कारवाई केली आणि त्यात अवैध धंदे उघडकीस आल्यास संबंधीत प्रभारी अधिकार्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

No comments:

Post a Comment