कचरा वेचणार्‍या महिलांना मास्क, सॅनीटायझर व सी जीवनसत्व गोळ्यांचे वाटप; शरद पवार विचार मंचचा उपक्रम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, June 1, 2021

कचरा वेचणार्‍या महिलांना मास्क, सॅनीटायझर व सी जीवनसत्व गोळ्यांचे वाटप; शरद पवार विचार मंचचा उपक्रम

 कचरा वेचणार्‍या महिलांना मास्क, सॅनीटायझर व सी जीवनसत्व गोळ्यांचे वाटप; शरद पवार विचार मंचचा उपक्रम

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः हातावर पोट असलेल्या कचरा वेचणार्‍या महिलांना रामवाडी येथे शरद पवार विचार मंचच्या वतीने कोरोनापासून बचाव होण्यासाठी मास्क, सॅनीटायझर व सी जीवनसत्व गोळ्यांचे वाटप करण्यात आले. कागद, काच, पत्रा, कष्टकरी पंचायतच्या दीडशे पेक्षा जास्त असंघटित महिला कामगार वर्गाल सदर मदत देण्यात आली. यावेळी शरद पवार विचार मंचचे जिल्हाध्यक्ष अल्ताफ सय्यद, कष्टकरी पंचायतचे अध्यक्ष विकास उडाणशिवे, सामाजिक कार्यकर्ते पप्पू पाटील, डॉ.ईलीयास शेख, विकास धाडगे, गणेश ससाणे, बाळू माने, दीपक लोखंडे आदी उपस्थित होते.
अल्ताफ सय्यद म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या टाळेबंदीत हातावर पोट असलेल्या कष्टकरी बांधव मोठ्या संकटातून जात आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट बनला आहे. शरद पवार विचार मंचच्या वतीने अशा कष्टकरी बांधवांना मदतीचा हात देण्याचे काम मागील वर्षापासून सुरु आहे. सध्या कोरोनाचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात कचरा वेचणार्या महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनाने व त्यांचे कोरोनापासून रक्षण होण्याकरिता त्यांना मास्क, सॅनीटायझर व सी जीवनसत्व गोळ्यांचे वाटप करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र प्रशासनाने देखील आपली जबाबदारी स्विकारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पप्पू पाटील यांनी टाळेबंदी काळात शरद पवार विचार मंचच्या वतीने गरजूंना अन्न-धान्यासह किराणा किटचे वाटप करण्यात आले. तसेच विविध उपक्रमाच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेले उपक्रम प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी शरद पवार विचार मंचचे तालुकाध्यक्ष अर्जुन बडेकर, आयान सय्यद, मुजाहिद सय्यद, अजित भालेराव, शकील सय्यद यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment