घरकुल योजनेच्या निधीचे पंचायत समितीमार्फत वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, June 16, 2021

घरकुल योजनेच्या निधीचे पंचायत समितीमार्फत वाटप

 घरकुल योजनेच्या निधीचे पंचायत समितीमार्फत वाटप


नगरी दवंडी/प्रतिनिधी
खरवंडी कासार ः पंचायत समिती पाथर्डी मार्फत पंडित दीनदयाल उपाध्य घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना अंतर्गत पाथर्डी तालुक्यातील 11 लाभार्थी याना प्रधानमंत्री आवास व रमाई आवास अंतर्गत घरकुल बांधण्यासाठी जागा खरेदी करण्यासाठी अर्थसाह्य अनुदान वितरित करण्यात यावेळी पंचायत समितीच्या सभापती सौ सुनीताताई गोकुळ  दौंड व उपसभापती सौ.मनिषा रविंद्रा वायकर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शितल खिंडे पंचायत समिती सदस्य श्री राहुल गवळी युवा नेते श्री गोकुळभाऊ दौंड श्री रवींद्र वायकर विस्तार अधिकारी श्री  प्रशांत तोरवणे श्री दादासाहेब शेळके पंचायत समितीचे श्री अमोल तांदळे श्री ऋषी पालवे महाऑनलाईन चे तालुका समन्वयक श्री महादेव हाडके श्री वसंत कुसळकर श्री प्रकाश आघाव तसेच विविध गावचे पात्र लाभार्थी व विविध गावचे ग्रामसेवक यावेळी उपस्थित होते यावेळी पाथर्डी तालुक्यातील विविध आवास  योजने अंतर्गत मंजूर लाभार्थ्यांची प्रस्ताव पंचायत समितीमार्फत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला पाठविण्यात आले होते त्यात अकरा लाभार्थ्यांना साधारण 214000  हजार रुपये इतकी अनुदानाची चेक वितरण यावेळी करण्यात आले यावेळी बोलत असताना सभापती सौ सुनीताताई दौंड यांनी सांगितले की ग्रामीण भागातील मंजूर असलेली सर्व घरकुले तातडीने पूर्ण करून घ्यावी व शासनाचा अनुदान प्राप्त करून घ्यावे तसेच महा आवास अभियानामध्ये पंचायत समिती पाथर्डी चे अधिकारी कर्मचारी व विविध गावचे ग्रामसेवक व पदाधिकार्‍यांनी चांगलं काम केल्यामुळे तालुक्यातील आवास योजनेला गती आली असे यावेळी सभापती सुनीताताई दौंड यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here