पदोन्नतीमध्ये मागासवर्गीय आरक्षणाचा निर्णय त्वरित घेण्याबाबत तहसीलदारांना निवेदन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, June 4, 2021

पदोन्नतीमध्ये मागासवर्गीय आरक्षणाचा निर्णय त्वरित घेण्याबाबत तहसीलदारांना निवेदन

 पदोन्नतीमध्ये मागासवर्गीय आरक्षणाचा निर्णय त्वरित घेण्याबाबत तहसीलदारांना निवेदन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः  मागासवर्गीवांच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारने दलित विरोधी भूमिका घेतली आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीमध्ये मागासवर्गीय आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेण्याचे निर्देश दिले आहेत. महाविकास आघाडी सरकार स्वतःला पुरोगामी म्हणवत असले तरी पदोन्नतीमधील मागासवर्गीवांच्या आरक्षणाबाबत दलित विरोधी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे ही भूमिका बदलून पदोन्नतीमध्ये मागासवर्गीय आरक्षणाचा निर्णय त्वरित घ्यावा रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार आरपीआयचे जिल्लाध्यक्ष सुनील साळवे , तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप यांच्या नेतृत्वखाली श्रीगोंदा तहसिल कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन श्रीगोंदा तहसीलदार प्रदीप पवार तसेच पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना दिले यावेळी शेखर घोडके, राम घोडके, अमोल घोडके, विकास घोडके, योगेश घोडके, आनंद घोडके, अमोल ढवळे, रंजीत मखरे, तृषाल ससाने, तुषार जगताप,भूषण घाडगे, मयूर घोडके, शुभम घोडके उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here