5 जूनला जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकरीविरोधी अन्यायकारक कृषी कायद्यांची होळी करून मोदी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘इशारा आंदोलन’ - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 4, 2021

5 जूनला जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकरीविरोधी अन्यायकारक कृषी कायद्यांची होळी करून मोदी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘इशारा आंदोलन’

 5 जूनला जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकरीविरोधी अन्यायकारक कृषी

कायद्यांची होळी करून मोदी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘इशारा आंदोलन’


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व अ.भा. किसान सभा यांच्यावतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी शेतकरीविरोधी अन्यायकारक तीन काळ्या कायद्यांच्या विरोधात त्या कायद्याच्या प्रती जाळून ’इशारा दिवस’ पाळणार असल्याची माहिती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव अ‍ॅड.कॉ.सुभाष लांडे आणि किसानसभेचे राज्यसचिव अ‍ॅड.कॉ. बन्सी सातपुते यांनी दिली.
दि.5 जुन 2020 रोजी मोदी सरकारने शेतकरीविरोधी अन्यायकारक काळे कायदे लागु करण्यासाठी अध्यादेश काढलेला होता. या अध्यादेशाच्या विरोधात अखिल भारतीय किसान सभेसह सर्व शेतकरी समर्थक संघटना व अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती यांनी राष्ट्रव्यापी आंदोलन सुरु केलेले आहे. त्याला एक वर्ष पुर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरीविरोधी तीनही कृषी कायदे रद्द करा. कृषी निविष्ठा, बि-बियाणे, औषधे जी.एस.टी, मुक्त करा. हमी भावासाठी कायदा करा. कोरोना लस सर्वांना मोफत द्या. डिझेल - पेट्रोल वरील अबकारी कर कमी करून त्याचे भाव कमी करा. कांदा, बटाटा व इतर कृषी मालाला किमान हमीभाव जाहीर करा. या मागण्यांसाठी कृषी कायद्यांच्या प्रती जाळून चेतावणी दिवस पाळला जाणार आहे.
6 जून 2018 रोजी मध्यप्रदेशातील मंदसौर येथे हमीभावासाठी आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर भाजप सरकारने गोळीबार केला होता. त्यात 6 शेतकरी शहीद झाले होते. त्यानंतरच देशव्यापी शेतकरी  आंदोलन उभे राहिले. त्या शेतकरी शहिदांना आदरांजली म्हणून दि.6 जुन रोजी ‘संकल्प दिवस’ पाळला जाणार आहे. शनिवार दि.5 जून रोजी दुपारी 12:30 वा. अहमदनगर शहरातील घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर, मार्केटयार्ड, स्टेशनरोड येथे शेतकरीविरोधी कायद्याची होळी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे याच दिवशी सकाळी 9:30 वाजता भेंडे बु” येथे बसस्थानक चौकात. सकाळी 10 वाजता शेवगाव येथे बसस्थानक चौकात आणि सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक (चितळी चौक) राहाता येथे ’शेतकरीविरोधी कायद्याची होळी’ कोविडविषयक बाबींचे पालन करुन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात सर्व शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन अखिल भारतीय किसान सभेचे लक्ष्मण डांगे, बाबा आरगडे, कारभारी उगले, आण्णापाटील थोरात, बापूराव राशीनकर, भैरवनाथ वाकळे, संतोष खोडदे, कैलास शेळके, आर.डी.चौधरी, आप्पासाहेब वाबळे, संजय नांगरे, धोंडीभाऊ सातपुते, कानिफनाथ तांबे, सुरेश पानसरे, अशोक डुबे, अशोक नजन, कारभारी वीर, विकास गेरंगे, लक्ष्मण नवले, सिताराम लांबे, सुनील दुधाडे, राम पोटफोडे, आत्माराम देवढे, तुकाराम पवार, अनिल गुंजाळ, सतीश पवार आदींनी केले आहे. आयटक कामगार संघटनेने या आंदोलनाला पाठिंबा दिला असून कामगार वर्गाने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन आयटक चे जिल्हा सेक्रेटरी सुधीर टोकेकर, रामदास वागस्कर, निवृत्ती दातीर भारती न्यालपेल्ली, महादेव पालवे, लहुजी लोणकर, तुषार सोनवणे, कार्तिक पासलकर, सतीश निमसे, अमोल पळसकर, अरूण थिटे, अमोल चेमटे, रावसाहेब कर्पे, बाळासाहेब सागडे, वैभव कदम आदींनी केले केले.

No comments:

Post a Comment