नेत्रतज्ञ डॉ. प्रकाश कांकरियांना ‘फोर्बस् इंडिया’ संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय सन्मान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 4, 2021

नेत्रतज्ञ डॉ. प्रकाश कांकरियांना ‘फोर्बस् इंडिया’ संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय सन्मान

 नेत्रतज्ञ डॉ. प्रकाश कांकरियांना ‘फोर्बस् इंडिया’ संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय सन्मान


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः येथील साई सूर्य नेत्रसेवा संस्थेचे संचालक व लेसर किरण नेत्रशस्त्रक्रिया विशेषज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया ह्यांना ‘फोर्बस्’ ह्या संस्थेतर्फे त्यांनी केलेल्या दृष्टीदानाच्या कार्याबद्दल आंतरराष्ट्रीय सन्मान 2020-2021 (खश्रर्श्रीाळपरींळपस ढहश थेीश्रव) हा नुकताच जाहीर करण्यात आला आहे. डॉ. प्रकाश कांकरिया हयांचे त्याबद्दल सर्वच अभिनंदन होत आहे.
 15 ऑगस्ट 1985 साली डॉ. प्रकाश व डॉ. सुधा कांकरिया ह्यांनी अहमदनगर येथे ‘साई सूर्य नेत्रसेवा’ ह्या नेत्रउपचारासाठी प्रसिध्द संस्थेची स्थापना केली व अत्याधुनिक उपचार पध्दती विशेषत: लेसर किरण नेत्रउपचारामुळे संपूर्ण भारतातून व परदेशातूनही रूग्ण अहमदनगरला येऊ लागले. डॉ. प्रकाश कांकरिया ह्यांनी अनेक उपचार पध्दती लेसर किरणांचा वापर करून भारतात प्रथमच अहमदनगर सारख्या ठिकाणी मुंबई दिल्ली पेक्षाही लवकर विकसीत करून हजारो नेत्ररूग्णांवर विशेषत: चष्म्याचा नंबर घालविण्याच्या शस्त्रक्रिया व नेत्ररोपणाच्या शस्त्रक्रिया करण्यामध्ये विशेष आंतरराष्ट्रीय नाव मिळविले अतिशय कमी वयात महाराष्ट्र राज्य नेत्रतज्ञ संघटनेचे अध्यक्षपद व रिर्फॅक्टिव्ह सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्षपद त्याचप्रमाणे इंडियन मेडिकल असोसिएशन अध्यक्षपदही सन्मानाने मिळाले. जगात प्रथमच एका दिवसात 100 पेक्षा अधिक लॅसिक लेसर नेत्रशस्त्रक्रिया करून जागतिक विक्रम केला तर असे 50 वेळ करणारे ते जगातील पहिलेच व एकमेव नेत्रतज्ञ ठरले. स्वत:च्या आईवडिलांचे मरणोत्तर नेत्रदान स्वत:च्या हाताने करून अंध व्यक्तींवर नेत्ररोपण करणारे ते भारतातील पहिलेच नेत्रतज्ञ ठरले. लग्नाच्या मुलींना चष्म्यामुळे लग्नास अडथळा असल्यामुळे व सैन्यात जाणार्या मुलांसाठी अनेक वर्षांपासून लेसर नेत्रशस्त्रक्रिया शिबीरे घेत असून आजपर्यंत सुमारे 2 लाख लेसर नेत्रशस्त्रक्रिया करू शकणारे जगातील अतिशय कमी नेत्रतज्ञांमध्ये त्यांची नोंद घेतली जाते. ह्या सगळया गोष्टींची नोंद ‘फोबस्’ह्या संस्थेने घेऊन ह्या वर्षीचा हा आंतरराष्ट्रीय सन्मान डॉ. प्रकाश कांकरिया ह्यांना जाहीर करण्यात आला. ह्या सर्व यशामध्ये डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. सौ. सुधा कांकरिया, साई सूर्यनेत्रसेवाची टीम व समाजाने दिलेली संधी व संतांचे आशीर्वाद त्यांना देतात. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment