छत्रपती संभाजीराजे 2 जुलै रोजी जामखेड दौऱ्यावर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, June 29, 2021

छत्रपती संभाजीराजे 2 जुलै रोजी जामखेड दौऱ्यावर

 छत्रपती संभाजीराजे 2 जुलै रोजी जामखेड दौऱ्यावर

 


नगरी दवंडी

जामखेड प्रतिनिधी 

मराठा समाजाचे आरक्षण सध्यस्थीती या विषयावर प्रबोधन करण्यासाठी महाराष्ट्राचे  छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज ,लोकनेते, खासदार छत्रपती संभाजी राजे हे दि 2 जुलै रोजी जामखेड येथे येणार आहेत. 

सदर कार्यक्रमाचे आयोजन सकल मराठा समाजाच्या वतीने नगरपरिषद कार्यालय प्रांगण ,बाजार तळ जामखेड येथे करण्यात आले आहे, सदर कार्यक्रमासाठी सकल मराठा समाज व सर्व बहुजन समाज यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मा श्री रघुनाथ चित्रे पाटील, पुणे यांनी केले आहे ,ते आज त्यासंदर्भात नियोजन बैठकिस विश्रामगृह जामखेड येथे आले होते, सदर बैठकीस प्रा मधुकर आबा राळेभात, सूर्यकांत नाना मोरे, बबन काका काशिद, शहाजी राजेभोसले, विकास तात्या राळेभात, प्रदीप टापरे,अरुण आबा जाधव, शरद शिंदे, मंगेश दादा आजबे, गुलाबशेठ जांभळे ,अड हर्षल डोके, नामदेव राळेभात, राहुल उगले, कुंडल राळेभात, अमित जाधव, शहाजी डोके, संतोष खैरे, बापूसाहेब शिंदे, हवा सरनोबत, प्रा लक्ष्मण ढेपे, अविनाश बोधले, किरण रेडे, दत्ता भाकरे, शुभम कोहकडे, सुनील उबाळे, अवधूत पवार, राम निकम आदी उपस्थित होते, ते शुक्रवारी सकाळी आष्टी येथून भव्य रॅलीसह आष्टी, जामखेड, पाटोदा, नायगाव व बीड अशी भव्य रॅली काढणार येणार आहे व सर्व सकल मराठा समाजास संबोधित करणार आहेत तरी ज्या व्यक्तींना रॅलीमध्ये समाविष्ठ व्हायचे असेल त्यांनीही सदर रॅलीमध्ये जामखेड पासून समाविष्ठ व्हावे असे आवाहन जामखेड सकल मराठा च्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here