ब्युटी पार्लर, सलुन कामगारांचे प्राधान्याने लसीकरण करा : औटी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, June 10, 2021

ब्युटी पार्लर, सलुन कामगारांचे प्राधान्याने लसीकरण करा : औटी

 ब्युटी पार्लर, सलुन कामगारांचे प्राधान्याने लसीकरण करा : औटी

ओबीसी बारा बलुतेदार संघटनेचे  आयुक्तांना,जिल्हाधिकारीसह राज्य शासनाकडे निवेदन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः केशकर्तन कारागिरांना फ्रन्टलाईन वर्कर म्हणून त्यांचे लसीकरण करावे कारण  इतर व्यावसायिकांचा  थेट ग्राहकांशी  संबंध येत नाही परंतु नाभिक सलुन दुकानदारांचा  प्रत्यक्ष नागरिकांशी  जवळून संपर्क येत असतो.  सलून व्यवसायिक ,ब्युटी  पार्लर करणा-या महिला  सर्व शासकीय नियम पाळून काम करत आहेत.  तरी पण या व्यवसायिकांना कोरोनाचा धोका जास्त आहे कारण व्यवसायिक आणि ग्राहक समोरासमोर असतात म्हणूनच या व्यवसायिकांना फ्रंन्टलाईन वर्कर म्हणून लसीकरण करावे . त्याच बरोबर ब्युटीपार्लर चालविणार्‍या महिलांचे ही फ्रंटलाईन वर्कर म्हणून लसीकरण करावे अशी मागणी ओबीसी बाराबलुतेदार संघटनेचे शहर अध्यक्ष शाम भाऊ  औटी यांनी नगर मनपा आयुक्त ,जिल्हाधिकारी आणि राज्य शासनाकडे केली आहे.
शहरात लहान-मोठे सलून सरसरी550ते600तर ब्युटी पार्लर 300-350 आहेत याशिवाय येथे काम करणारे कारागीरनाभिक ब्युटी पार्लरसह एक हजारापर्यंत बांधव असून त्याचा बरोबर 400 पर्यंत महिलाही आहेत . शासनाच्या नियमाचे पालन करून व्यवसाय करताना दुकानात अथवा ब्युटीपार्लर मध्ये येणार्‍या ग्राहकांबद्दल कोणतीही हमी देता येत नाही.त्यामुळे व्यवसाय करताना कोरोनाची लागण होण्याची टांगती तलवार कायम या लोकांवर आहे.असते.  त्यामुळे केशकर्तन कारागीर आणि ब्युटीशियन्स ना शासनाने तातडीने लसीकरण केल्यास किमान लसीचे कवच आम्हा व्यावसायिकांना लाभेल असे या निवेदनात म्हटले आहे .
या निवेदनावर  शाम भाऊ औटी सह ओबीसी बारा बलुतेदार महासंघ जिल्हा अध्यक्ष व  नाभिक महामंडळ प्रांत उपाध्यक्ष माऊली गायकवाड.महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे नगर जिल्हाध्यक्ष इंजि.बाळासाहेब भुजबळ,, जिल्हा उपाध्यक्ष  अनिल इवळे, सोमनाथ कदम, युवा जिल्हा अध्यक्ष आर्यन गिरमे, जिल्हा कार्याध्यक्ष  रमेश बिडवे, सलून अध्यक्ष अनिल निकम,  ओबीसी बाराबलुतेदार महासंघाच्या  महिला शहर जिल्हाध्यक्षा अनुरिता झगडे ,महिला जिल्हाध्यक्षा मनीषा गुरव,उपाध्यक्षा छाया नवले, ब्युटीपार्लर्स असोच्या अनुजा कांबळे ,नाभिक महिला जिल्हाध्यक्षा वनिता बिडवे,उपाध्यक्षा सुलभा सटाणकर ,  यांच्यासह अन्य पदाधिकारी,सदस्यांच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment