कोविडच्या पार्श्वभूमीवर मर्चंटस् बँकेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लाख - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 11, 2021

कोविडच्या पार्श्वभूमीवर मर्चंटस् बँकेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लाख

 कोविडच्या पार्श्वभूमीवर मर्चंटस् बँकेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लाख


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अहमदनगर मर्चंटस् को ऑप.बँकेने कोविड महामारी लक्षात घेवून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लाखांची मदत केली आहे.  विद्यमान सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याकडे या मदतीचा धनादेश सुपुर्द करण्यात आला. यावेळी बँकेचे संस्थापक चेअरमन तथा ज्येष्ठ संचालक हस्तीमलजी मुनोत, विद्यमान चेअरमन अनिल पोखरणा, व्हाईस चेअरमन सुभाष बायड, संचालक संजय बोरा उपस्थित होते. सहकार आयुक्त श्री अनिल कवडे म्हणाले की, अहमदनगर मर्चंटस् बँकेच्या  कामकाजाबाबत अहमदनगर जिल्हाधिकारी असल्यापासून परिचित आहे. उत्कृष्ट बँकिंग सेवा देतानाच सामाजिक कार्यातही ही बँक नेहमीच अग्रेसर असते. सहकारातून समृध्दी हा मंत्र जपताना सामाजिक उत्तरदायित्त्व पार पाडण्यात बँक देत असलेले योगदान कौतुकास्पद आहे. करोना महामारीला समर्थपणे तोंड देण्यासाठी अशाच सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.
चेअरमन अनिल पोखरणा म्हणाले की, बँकेचे संस्थापक चेअरमन हस्तीमलजी मुनोत यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने नेहमीच आपत्तीच्या प्रसंगात समाजासाठी योगदान दिले आहे. संकट समयी कर्तव्यभावनेने समाजाला मदत करण्यात बँक नेहमीच अग्रेसर असते. कोविड महामारी आल्यावर  आताही पुन्हा 11 लाख रुपये मदत देण्यात आली आहे.
हस्तीमलजी मुनोत यांनी सांगितले की, कोविड काळात मर्चंटस् बँकेने सुरक्षितीतेची सर्व काळजी घेवून ग्राहकांना अविरत सेवा दिली आहे. बँकेने सुरुवातीपासून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे. लातूर जिल्ह्यातील किल्लारी भूकंप, गुजरातमधील कच्छ भूकंप, महाराष्ट्रातील दुष्काळ अशा आपत्तीच्या प्रसंगात बँकेने सक्रिय योगदान दिले आहे. नगरमध्येही राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी 28 मार्चला बँकेमार्फत रक्तदान शिबीर घेण्यात येते.

No comments:

Post a Comment