आयकॉन पब्लिक स्कूलला सर्वोकृष्ट उदयोन्मुख विद्यालयाचा पुरस्कार प्रदान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, June 11, 2021

आयकॉन पब्लिक स्कूलला सर्वोकृष्ट उदयोन्मुख विद्यालयाचा पुरस्कार प्रदान

 आयकॉन पब्लिक स्कूलला सर्वोकृष्ट उदयोन्मुख विद्यालयाचा पुरस्कार प्रदान


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः येथील आयकॉन पब्लिक स्कूलने गेल्या दहा वर्षांत केवळ अहमदनगरच नव्हे तर इतरही शहरांमध्येही आपला ठसा उमटविला आहे. शाळेला 7 नोव्हेंबर 2020 ला जी.एस.एल.सी उत्कृष्टता प्रेरणा शिक्षण पुरस्कार 2020 चा पुरस्कार हे  पारितोषिक जिंकून सर्वोकृष्ट उदयोन्मुख विद्यालयाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तसेच शाळेने हॉल ऑफ फेम या स्पर्धेत देखील नाविन्यपूर्ण संस्था हा किताब पटकावला. अशा व्यक्ती किंवा संस्था ज्या मानव केंद्रित विचारधारा असणार्‍या आहेत त्यांच्या छुप्या व नाविन्यपूर्ण कौशल्यांचा गौरव करण्यासाठी हे पारितोषिक दिले जाते.परीक्षकांनी ठरवलेले पूर्वनियोजित निकष आणि मतमोजणीच्या आधारावर अंतिम फेरीतील स्पर्धक निवडले जातात. 30 मे 2021 रोजी संध्याकाळी 6 वाजता हमसेन च्या फेसबुक पेजवर पारितोषिक वितरण समारंभ प्रसारित करण्यात आला. या प्रसारणाच्या वेळी शाळेच्या संचालिका सौ. आराधना राणा आणि मुख्याध्यापिका सौ. दिपीका नगरवाला यांच्यासोबत शाळेचे व्यवस्थापक, शिक्षक मंडळी आणि पालक वर्ग हे देखील उपस्थित होते. सर्वांगिण आणि उच्च दर्जाचे शिक्षण हे आयकॉन पब्लिक स्कूल चे मुख्य ध्येय आहे. त्याद्वारे प्रत्येक मुलाचा सामाजिक, शारिरीक, मानसिक, सर्जनशील, सौंदर्यपूर्ण व बौद्धिक विकास करण्यावरच शाळेचा भर असतो. आयकॉन स्कूल नेहमीच नाविन्यपूर्ण शिक्षणपद्धती व अनुभवात्मक शिक्षण या बाबतीत काळाच्या पुढे राहून प्रयत्न करीत आलेली आहे.अशाप्रकारे विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास, मूल्यशिक्षण, चारित्र्यविकास, ज्ञान आणि विचारशक्ती यांच्या जडणघडणीला जोड मिळते. शाळेच्या नावाप्रमाणेच आम्ही उद्याच्या नेतृत्वाचा पाया आम्ही उभा करीत आहोत. ज्याप्रमाणे जीवनाचा कोणताही अभ्यासक्रम नसतो, त्याचप्रमाणे आम्ही आमच्या प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही जीवनातील बदलत्या काळासाठी आणि वर्गाच्या चारभिंतीबाहेरील अवघड प्रसंगांना सक्षमपणे तोंड देण्यासाठी तयार करत आहोत.

No comments:

Post a Comment