नगर-कल्याण रोड परिसरातील जाधवनगर येथील कोरोनाने निधन झालेले मच्छिंद्र नगराळे परिवारास 1 लाख 61 हजाराचा चेक प्रदान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, June 21, 2021

नगर-कल्याण रोड परिसरातील जाधवनगर येथील कोरोनाने निधन झालेले मच्छिंद्र नगराळे परिवारास 1 लाख 61 हजाराचा चेक प्रदान

 नगर-कल्याण रोड परिसरातील जाधवनगर येथील कोरोनाने निधन झालेले मच्छिंद्र नगराळे परिवारास 1 लाख 61 हजाराचा चेक प्रदान


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अ‍ॅड. स्वर्गीय मच्छिंद्र नगराळे यांनी आपली कायदा व विधीचे शिक्षण अत्यंत हलाखीच्या व गरिबीमध्ये यशस्वी पूर्ण केले कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी आपल्या व्यवसायाला अतिशय प्रामाणिकपणे सुरुवात केली, जनमानसात स्व. नगराळे यांचा चांगला परिचय होता. त्यांनी अनेक गरजुंना अनेक प्रकारचे सहकार्य करत असत ,आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर व्यवसायात त्यांनी आपल्या अनेक अशिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. अतिशय कष्टाळू ,नम्रशील, कायदा आणि गीतेचे गाढे अभ्यासक ,ज्ञानेश्वरीवर प्रभुत्व असलेले, धार्मिक प्रवृत्तीचे, नेहमी सर्वांसाठी मदतीसाठी पुढाकार घेणारे असे परिचित असणारे व कल्याण रोड परिसरातील सर्वांना हेवा वाटावा असे स्वर्गीय मच्छिंद्र नगराळे यांचे दोन महिन्यापूर्वी कोरोनाने निधन झाले.

त्यांच्या जाण्यानं नगराळे परिवारावर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला त्यांची घरची परिस्थिती अतिशय बेताची असून त्यांच्या पाठीमागे पत्नी ,दोन मुली व एक मुलगा असून त्यांना त्यांच्या भविष्यासाठी आधार देण्याची अतिशय गरज आहे त्या कुटुंबाला आधार देण्यासाठी व मुलांच्या भविष्यातील शिक्षणासाठी भरीव मदत मिळावी यासाठी कल्याण रोड परिसरातील शिक्षक सेनेचे शहरजिल्हाध्यक्ष श्री.पारुनाथ ढोकळे सर यांनी कल्याण रोड परिसरातील नागरिकांना व आपल्या थहरीं’ी र्ीि ग्रुपमधील सर्व सदस्यांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले होते.
या मदतीसाठी आदरणीय माजी प्राचार्य खासेराव शितोळे सर ,प्रा. उत्तमराव राजळे सर अँड. चेतन रोहकले , अँड अंकुशराव रोहकले ,डॉ. विजय म्हस्के, अँड गजानन गटणे, श्री. गणेश डेरे यांनी आपापल्या माध्यमातून मदतीसाठी आपल्या मित्र परिवारांला आवाहन केले. या आवाहनाला कल्याण परिसरातील, इतर ठिकाणाहून अनेक नागरिक बंधू भगिनी आणि नगराळे परिवारावर प्रेम व जिव्हाळा असणारे अनेक वकील बंधू-भगिनी यांनी मदतीसाठी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला आणि जवळपास एक लाख 61 हजार रुपयाची मदत या  कुटुंबाला मिळवून दिली . भविष्यात नगराळे परिवाराला व त्यांच्या मुलींना व मुलांना जी काही गरज लागेल ,शिक्षणाची असेल किंवा इतर काही गरज असेल ती आम्ही सर्व कल्याण रोड परिसरातील नागरिक देण्याचा निश्चित प्रयत्न करू असे आदरणीय माजी प्राचार्य खासेराव शितोळे सर यांनी यानिमित्ताने सांगितले. चेक प्रदान करण्याचा कार्यक्रम कल्याण रोड परिसरातील जाधव नगर येथील डऋए ढठएए खछऊणडढठखड ङखचखढएऊ संचलित ऋचखङध विश्व मॉल येथे संपन्न झाला.
मित्रांनो भविष्यात या कुटुंबाला, त्यांच्या दोन्ही मुलींच्या व मुलाच्या शिक्षणासाठी  जास्तीत जास्त आर्थिक मदतीची गरज लागणार आहे. तरी यापुढे आपण समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था ,संघटना यांनीसुद्धा या परिवारासाठी मदत करावी असे आवाहन श्री. पारुनाथ ढोकळे सर यांनी यानिमित्ताने केले आहे. स्वर्गीय नगराळे परिवाराला आर्थिक मदतीचा चेक देताना माजी प्राचार्य खासेराव शितोळे सर, शहर जिल्हाध्यक्ष श्री. पारुनाथ ढोकळे सर ,नगरी दवंडीचे संपादक श्री. रामभाऊ नळकांडे, सेफ ट्री इंडस्ट्रीज कंपनीचे चेअरमन श्री. परशुराम कोतकर, कंपनीचे सचिव श्री प्रा. मनोहर गोबरे सर ,प्रा.उत्तमराव राजळे सर, अँड. गजानन गटणे, सौ.सत्यभामा कानडे मॅडम ,डॉ.विजय म्हस्के सर ,प्रा.श्री.अनिल आठरे सर, श्री. अरुण कर्डिले , अँड.अजित रोकडे ,श्री संतोष कोरडे, मेजर पर्वतराव हराळ मेजर, हरिभाऊ चव्हाण सर , श्री.  बाबुराव कानडे ,श्री भाऊसाहेब डेरे, सौ आशा डेरे व नगराळे परिवारातील पत्नी , दोन्ही मुली व मुलगा यांच्या उपस्थितीमध्ये नगराळे परिवाराला चेक प्रदान करण्यात आला. यापुढे आपणास नगराळे परिवारास मदत पत्नी श्रीम.जयश्री मच्छिंद्र नगराळे यांच्या बँक ऑफ बडोदा येथील खाते नंबर 04550100011241  यावर जरुर जरुर करावीव  त्यांचा फोन नंबर पुढिलप्रमाणे 9604142372 , 9370359242 या नंबर वर आपण जरूर संपर्क साधावा ही विनंती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here