मनपा ओंकारनगर शाळेत ऑनलाईन योगदिन साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, June 21, 2021

मनपा ओंकारनगर शाळेत ऑनलाईन योगदिन साजरा

 मनपा ओंकारनगर शाळेत ऑनलाईन योगदिन साजरा


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः महानगरपालिकेच्या केडगाव येथील आय.एस.ओ. मानांकन प्राप्त ओंकारनगर प्राथमिक शाळेत ऑनलाईन आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला.मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी सुभाष पवार, पर्यवेक्षक जुबेर पठाण, मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी, सहशिक्षक शिवराज वाघमारे, सहशिक्षिका वृषाली गावडे, विद्यार्थी व पालक यांनी योगदिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला.
कोरोनामुळे याही वर्षी प्रत्यक्ष शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत.त्यामुळे ओंकारनगर शाळेने ऑनलाईन आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्याचा निर्णय घेतला.आठ दिवस अगोदरच शाळेतील शिक्षकांनी सर्व वर्गातील विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सप ग्रुपवर योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार यांचे व्हिडिओ पाठवले.तसेच विद्यार्थ्यांकडून योगासनांच्या प्रात्यक्षिकांचा सराव करून घेतला.
योगदिनाच्या दिवशी सकाळी सर्वांनी एकाच वेळी विविध आसने, सूर्यनमस्कार, प्राणायाम यांची प्रात्यक्षिके केली.
आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या कार्यक्रमामध्ये प्रशासनाधिकारी सुभाष पवार, पर्यवेक्षक जुबेर पठाण, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रविण मुळे, उपाध्यक्ष रविंद्र पानसरे, सदस्य सविता लोखंडे,संजय वर्तले यांनी उत्साहाने सहभाग घेतला.मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी, सहशिक्षक शिवराज वाघमारे,सहशिक्षिका वृषाली गावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here