काटाळवेढा येथे सव्वा कोटीचा निधी मंजूर.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 26, 2021

काटाळवेढा येथे सव्वा कोटीचा निधी मंजूर..

 काटाळवेढा येथे सव्वा कोटीचा निधी मंजूर..

सभापती काशिनाथ दाते सर यांच्या हस्ते कामांचे भूमिपूजन व लोकार्पण!नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी :

काटाळवेढा ता. पारनेर येथील १. पळसपुर  ते जिल्हा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे ( ग्रामा-२०) सा.क्र. ०/० ते २/३०० रु. २० लक्ष, २. कातळवेढा ते दत्त मंदिर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे( ग्राम-२४१) सा.क्र. ०/० ते १/० रु. १५ लक्ष, ३. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरवाडी नवीन खोली इमारत लोकार्पण करणे- रु. ८.७५ लक्ष अशा एकूण  ४३.७५ लक्ष निधी असलेल्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती मा. काशिनाथ दाते सर, पंचायत समितीचे सभापती गणेशराव शेळके, शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले ,शिवसेना तालुका प्रमुख विकास रोहकले3 या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी बोलताना सभापती दाते सर म्हणाले की काटाळवेढा गावाकरिता जवळपास सव्वा कोटीचा निधी मंजूर केला असून लवकरच तेही कामे सुरू होतील माझ्या जिल्हा परिषद बांधकाम समितीच्या माध्यमातून या गावचा चेहरामोहराच निश्चितच बदलून  सर्वसामान्यांचे दळणवळणाचे प्रश्न या रस्त्यामुळे मार्गी लागले जातील असेही ते म्हणाले  सरपंच पियुष गाजरे, उपसरपंच वैशाली भाईक, माजी सरपंच ठका शेठ कडुसकर, सुदाम गाजरे, ग्राम.सदस्य भाऊसाहेब डोंगरे,लहु गुंड, भाऊसाहेब कोकाटे, रामदास गाजरे, मा.क.सं. खंडु भाईक,अर्जुन गाजरे, संभाजी भाईक, पळसपुर चे सरपंच किसन डोंगरे, म्हसोबाझाप चे माजी सरपंच भाऊसाहेब आहेर, चेअरमन बाबाजी आहेर, भास्कर डोंगरे, उप अभियंता अहिरे रावसाहेब, कामाचे ठेकेदार फारुक शेख, बबन वाळुंज आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठकाशेठ कडुसकर यांनी केले तर आभार माजी सरपंच सुदाम गाजरे यांनी मानले.

No comments:

Post a Comment