महाराणी ताराबाई कन्या विद्यालयात ऑनलाईन शाहू जयंती साजरी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, June 26, 2021

महाराणी ताराबाई कन्या विद्यालयात ऑनलाईन शाहू जयंती साजरी

 महाराणी ताराबाई कन्या विद्यालयात ऑनलाईन शाहू जयंती साजरी




नगरी दवंडी / प्रतिनिधी 

अहमदनगर :  केडगाव येथील महाराणी ताराबाई कन्या विद्यालयांमध्ये राजर्षीशाहू महाराज जयंतीचा कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक जयश्री कोतकर  यांनी केले .संस्थेचे अध्यक्ष  रमेश गवळी ,संस्थेचे सचिव बबनराव कोतकर व संचालक प्रल्हाद साठे यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या  प्रतिमेचे पूजन करण्यात आले . इयत्ता आठवीची विद्यार्थिनी नक्षत्रा ढोरसकर व पाचवीची समृद्धी वारे  यांनी ऑनलाइन पद्धतीने शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारीत भाषण केले . भारती गुंड  यांनी राजर्षी शाहू महाराजांचे कार्य व त्यांच्या सामाजीक न्यायाची माहिती विद्यार्थिनींना सांगितली . प्राचार्या वासंती धुमाळ यांचेही भाषण झाले . तसेच त्यांनी विद्यार्थिनींचे कौतुक केले. या ऑनलाईन कार्यक्रमाचे आभार जालिंदर सातपुते यांनी मानले .


No comments:

Post a Comment