अहमदनगर भाजीपाला फळफळावळ आडत्यांचे असोसिएशनच्या वतीने प्रेरणा प्रतिष्ठानसाठी 1 लाख 31 हजार रुपयाचा धनादेश आमदार जगताप यांच्याकडे सुपुर्द. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 5, 2021

अहमदनगर भाजीपाला फळफळावळ आडत्यांचे असोसिएशनच्या वतीने प्रेरणा प्रतिष्ठानसाठी 1 लाख 31 हजार रुपयाचा धनादेश आमदार जगताप यांच्याकडे सुपुर्द.

अहमदनगर भाजीपाला फळफळावळ आडत्यांचे असोसिएशनच्या वतीने प्रेरणा प्रतिष्ठानसाठी 1 लाख 31 हजार रुपयाचा धनादेश आमदार जगताप यांच्याकडे सुपुर्द.



नगरी दवंडी

अहमदनगर(प्रतिनिधी)- कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत आर्थिक दुर्बल घटक, सर्वसामान्य कुटुंबातील कोरोना रुग्णांना आधार देण्यासाठी कोठी मार्केटयार्ड येथील अहमदनगर भाजीपाला फळफळावळ आडत्यांचे असोसिएशनच्या वतीने 1 लाख 31 हजार रुपयाची मदत प्रेरणा प्रतिष्ठानला देण्यात आली. मदतीच्या रकमेचा धनादेश आमदार संग्राम जगताप यांच्याकडे असोसिएशनचे अध्यक्ष अशोक लाटे यांनी सुपुर्द केला. यावेळी गणेश लालबागे, सचिव मोहन गायकवाड, राहुल म्हस्के, अशोक निमसे, पंकज कर्डिले, सारंग लाटे आदी उपस्थित होते.  

महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असताना अनेक स्वयंसेवी संघटना सर्वसामान्य घटकांना मदतीचा हात देत आहे. शहरात प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू घटक, सर्वसामान्य कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना विविध प्रकारे मदत देण्याचे कार्य सुरु आहे. या कार्यास हातभार लावण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत अहमदनगर भाजीपाला फळफळावळ आडत्यांचे असोसिएशनच्या वतीने मदत करण्यात आली.

आमदार संग्राम जगताप म्हणाले की, सर्व भाजीपाला, फळफळावळ व्यापार्‍यांनी स्वत:चा व्यवसाय बंद असून, देखील सामाजिक बांधिलकी ठेऊन दिलेली मदत कौतुकास्पद आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी पंधरा दिवस आपला व्यवसाय बंद ठेऊन त्यांनी प्रशासनाला सहकार्य करुन या लढ्यात सहभाग घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. संघटनेचे अध्यक्ष अशोक लाटे यांनी कोरोनाला हरविण्यासाठी माणुसकी जिवंत ठेवणे आवश्यक आहे. माणुसकीच्या भावनेने  सर्व भाजीपाला, फळफळावळ व्यापार्‍यांनी मदतीचा हात दिला आहे. आमदार संग्राम जगताप यांनी संकटकाळात शहराचे पालकत्व स्विकारुन सर्वसामान्यांना आधार दिल आहे. दिवसरात्र एक करुन त्यांची धावपळ सुरु आहे. प्रेरणा प्रतिष्ठानचे कार्य देखील उत्तमपणे सुरु असून, त्यांच्या कार्यास हातभार लावला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment