दरवाजाचे कडी कोयंडे तोडून चोऱ्या करणारे स्थानिक गुन्हे शाखेकडून तीन आरोपी जेरबंद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 15, 2021

दरवाजाचे कडी कोयंडे तोडून चोऱ्या करणारे स्थानिक गुन्हे शाखेकडून तीन आरोपी जेरबंद

 दरवाजाचे कडी कोयंडे तोडून चोऱ्या करणारे स्थानिक गुन्हे शाखेकडून तीन आरोपी जेरबंदनगरी दवंडी

अहमदनगर - दिनांक ०७/०५/२०२१ रोजीचे रात्री फिर्यादी श्री. दिपक भरत मोरे, वय २९ वर्षे, धंदा नोकरी, रा. खेड, ता. कर्जत, जि. अ. नगर हे रात्रीचे जेवण करुन कुटूंबासह घराचे पडवीमध्ये झोपले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांचे घराचे दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरामध्ये प्रवेश करुन घरातील कपाटाचा दरवाजा तोडून ४८,०००/ रु. किं. चे सोने चांदीचे दागिणे चोरुन नेले होते. सदर बाबत फिर्यादी यांनी कर्जत पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. १८६/२०२१ भादवि कलम ४५७, ३८० प्रमाणे दाखल करण्यात आलेला होता.

सदरचा गुन्हा दाखल पोनि / श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर हे त्यांचे पथकातील अधिकारी अंमलदार यांचे मदतीने समांतर तपास करीत असताना पोनि / श्री. अनिल कटके यांना गुप्त खबन्याकडून माहिती मिळाली कि, सदरचा गुन्हा रासर काळे, रा. भगतवाडी, ता. करमाळा याने व त्याचे साथीदारांनी मिळून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि/सोमनाथ दिवटे, पोसई/गणेश इंगळे, पोहेकॉ/दत्तात्रय हिंगडे, पोना/सुनिल चव्हाण, दिनेश मोरे, सुरेश माळी, संतोष लोढे, सचिन आडबल, प्रकाश वाघ, संदीप चव्हाण, रणजित जाधव, सागर ससाणे, राहूल सोळंके, मयूर गायकवाड, आकाश काळे, रोहित येमूल, मच्छिन्द्र बर्डे, जालिंदर माने, चालक पोहेकों/संभाजी कोतकर, चंद्रकांत कूसळकर अशांनी मिळून भगतवाडी, ता. करमाळा येथे जावून आरोपीचे ठावठिकाणाबाबत गोपनिय माहिती घेवून व सापळा लावून आरोपी नामे १) राजश्री उर्फ रासर सिकंदऱ्या काळे, वय- ४५ वर्षे, रा. भगतवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर यांस ताब्यात घेतले. त्याचेकडे सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्यास विश्वासात घेवून कसून व सखोल चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार प्रमोद रासर काळे, मेघराज राजा काळे, संज्या सिकंदर काळे, श्रीमंगल्या ज्ञानेश्वर काळे, झेलम सिंकदर काळे अशांनी मिळून केला असल्याची माहिती दिल्याने सदर माहितीचे आधारे आरोपींचा शोध घेवून आरोपी नामे २) प्रमोद राजश्री उर्फ रासर काळे, वय १९ वर्षे, रा. भगतवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर, ३) मेघराज राजा काळे, वय- २० वर्षे, रा. भगतवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. आरोपीकडून गुन्ह्यातील गेले मालापैकी एक सोन्याचे बदाम तसेच एक लोखंडी कत्ती व एक मोबाईल असा एकूण १७,२५०/-रु. किं. चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपींना मुद्देमालासह कर्जत पो.स्टे. ला.हजर करण्यात आले असून पुढील कार्यवाही कर्जत पो.स्टे. करीत आहेत. वरील नमुद आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांचे विरुध्द यापुर्वी खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

No comments:

Post a Comment