उद्योजक गवरामशेठ नवले यांच्याकडून डॉ श्रीकांत पठारे संचलित कोव्हीड सेंटरला सव्वा लाखांची मदत..! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, May 16, 2021

उद्योजक गवरामशेठ नवले यांच्याकडून डॉ श्रीकांत पठारे संचलित कोव्हीड सेंटरला सव्वा लाखांची मदत..!

 उद्योजक गवरामशेठ नवले यांच्याकडून डॉ श्रीकांत पठारे संचलित कोव्हीड सेंटरला सव्वा लाखांची मदत..!

मा. आमदार विजयराव औटी व तहसीलदार ज्योती देवरे यांच्या उपस्थिती मदत कोव्हीड सेंटरला सुपूर्द



नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

ग्रामीण रुग्णालय डेडिकेटेड डॉ श्रीकांत पठारे संचलित पूर्णवाद भवन येथे सुरु केलेल्या कोव्हीड सेंटरला राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. पारनेर तालुक्यातील नवलेवाडी येथील मुंबईस्थित उद्योजक गवरामशेठ नवले यांनी डॉ श्रीकांत पठारे संचलित कोव्हीड सेंटरला सव्वा लाखांची आर्थिक मदत दिली. माजी आमदार विजयराव औटी, तहसीलदार ज्योती देवरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले यांच्या उपस्थितीत ही मदत उद्योजक नवले यांनी कोव्हीड सेंटरला सुपूर्द केली.

डॉ श्रीकांत पठारे संचलित पारनेर येथील पूर्णवाद भवन येथे सुरू केलेल्या कोव्हीड सेंटरमध्ये आतापर्यंत अनेक रुग्णांनी उपचार घेऊन बरे झाले आहेत. सध्या देखील अनेक रुग्ण उपचाराधीन आहेत. या रुग्णांसाठी डॉ श्रीकांत पाठरे हे रात्रंदिन सेवा करत असल्याचा बातम्या व विडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून उद्योजक गवरामशेठ नवले यांनी मुंबई याठिकाणी पाहिले.  नवले हे मुंबई याठिकाणी मोठे उद्योजक आहेत. डॉ श्रीकांत पठारे करत असलेल्या सामाजिक कामावर प्रेरित होऊन तालुक्याची असलेली नाळ व ओढ यातून त्यांनी स्वतःच्या परीने या कोव्हीड सेंटरला मदत करण्याची कल्पना सुचली.ही कल्पना नवले यांनी माजी आमदार विजयराव औटी व रामदास भोसले यांच्याकडे मांडली. व त्यांनी आज पूर्णवाद भवन येथील डॉ श्रीकांत पठारे संचलित कोव्हीड सेंटरला सुमारे सव्वा लाख रुपयांची आर्थिक मदत माजी आमदार विजयराव औटी, तहसीलदार ज्योती देवरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले यांच्या उपस्थितीत कोव्हीड सेंटरला देण्यात आला. यावेळी डॉ पद्मजा पठारे, प्रमोद पठारे व कोव्हीड सेंटरमधील सर्व स्टाफ, डॉ श्रीकांत पठारे सोशल फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

      यावेळी उद्योजक गवरामशेठ नवले म्हणाले की, आज डॉ श्रीकांत पठारे कोव्हीड मुळे आजारी असल्याने याठिकाणी जरी नसले तरी त्यांची काम करण्याची पद्धत व रुग्णसेवा यावर प्रभावित होऊन ही मदत करत आहे. स्वतःचे खासगी हॉस्पिटल असताना देखील कोव्हीड सेंटरच्या माध्यमातून रुग्णांना मोफत उपचार करणारे डॉ श्रीकांत पठारे यांच्यासारखा डॉक्टर संबंध राज्यभरात नसून डॉ श्रीकांत पठारे जणू देवामाणुसच असल्याची प्रतिक्रिया उद्योजक गवरामशेठ नवले यांनी दिली.

माजी आमदार विजयराव औटी म्हणाले की, कोव्हीड सेंटर उभारण्याची कल्पना डॉ श्रीकांत पठारे यांना मी दिली होती. त्यातून त्यांनी कोव्हीड सेंटरच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करत आहे. खूप इच्छाशक्ती व मेहनती असणारा हा युवक आहे. त्यामुळे कोरोना आजारातून लवकर बरे होऊन डॉ श्रीकांत पठारे रुग्णांच्या सेवेत दाखल होनार असल्याचे मत माजी आमदार विजयराव औटी यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment