अश्लील व्हिडिओ बनवून एक कोटीची खंडणी मागणारी महिला साथीदारासह अटक - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 15, 2021

अश्लील व्हिडिओ बनवून एक कोटीची खंडणी मागणारी महिला साथीदारासह अटक

 अश्लील व्हिडिओ बनवून एक कोटीची खंडणी मागणारी महिला साथीदारासह अटक 

तालुका पोलीस स्टेशनची कारवाई.



 नगरी दवंडी

अहमदनगर - शरिरसंबधाचे आमीष दाखवुन अश्लील व्हीडीओ बनवत एक कोटी रुपयांची खंडणी मागून लाखोंना गंडा घालणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे 4 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर घटना नगर तालुक्यातील जखणगाव येथे घडली आहे. महिलेच्या घरामध्ये शरीरसंबंधांचे शुटिंग घेण्यात आले असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, या प्रकरणामध्ये अन्य काही जणांचा सुद्धा समावेश असण्याची शक्यता असून, पोलीस त्या दृष्टिकोनातून तपास करत आहेत.या घटनेमध्ये पोलिसांनी अमोल सुरेश मोरे (वय 30) व संबंधित महिला यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

दि.26 एप्रिल रोजी या गुन्ह्यातील आरोपीनी संगणमत करुन शरिरसंबंधाचे अमिष दाखवून आरोपी महिलेसोबत शरिरसंबंध ठेवण्यास भाग पाडून त्याचा अश्लील व्हीडीओ बनवला होता. आम्हास एक कोटी रुपये आणून दे नाहीतर सदर व्हिडिओ हा पोलीसांना दाखवून तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी आरोपींनी दिली होती. या घटनेतील फिर्यादी याने या सर्व घटनेची माहिती नगर तालुका पोलिसांना दिल्यानंतर नगर तालुका पोलिसांच्या पथकाने या घटनेचा शोध घेतला. नगरच्या कायनेटिक चौक येथे राहणारा आरोपी मोरे याने संबंधित फिर्यादीला त्या महिलेचे घर दाखवले होते. सदर महिला जखणगाव येथे राहत असून ती एका किराणा मालाच्या दुकानाची मालकीण आहे. त्या महिलेने फिर्यादीला घरी बोलावून त्याच्या बरोबर शारीरिक संबंध ठेवले व त्याच वेळेला व्हिडीओ काढून ठेवला होता. जर संबंधित फिर्यादीने काही आढावा घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला चाकूचा धाक दाखवण्यात आला होता. तसेच त्याला बांधण्यासाठी दोरी सुद्धा आणलेली होती. पोलिसांनी तपासा दरम्यान हे साहित्य सुद्धा जप्त केलेले आहे आहे.फिर्यादीच्या गळ्यात असणारे 5 तोळे वजनाची दोन लाख रुपये किमतीची सोण्याची चेन हातातील साडेसहा तोळे वजनाच्या 4 अंगठ्या व रोख रक्कम 84300 रुपये असा एकूण 544300 रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपींनी फिर्यादीला मारहाण करुन काढून घेतला होता.

महिला हिस ताब्यात घेवुन तीस विश्वासात घेवून विचारपुस केली असता, सदरचा गुन्हा हा तिने व तिचा साथीदार यास सोबत घेवून केल्याची कबुली दिली. तिला व तिचा साथीदार यास तात्काळ ताब्यात घेवुन अटक करण्यात आली. सदर महिलेने सदरची चेन ही भिंगार अर्बन बँक येथे तिने तिच्या भावाच्या नावे गहाण ठेवली होती. ती बँक मधुन ताब्यात घेण्यात आली आहे. तसेच तिच्या घरामधे सदर गुन्ह्यातील अंगठी व रोख रक्कम 69300 रुपये जप्त करण्यात आली व तिचा साथीदार याचेकडून गुन्ह्यातील 15000 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपींनी फिर्यादीस चाकूचा धाक दाखवून बांधुन घालून मारहाण करुन 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. सदर आरोपींनी आणखी कोणास यापद्धतीने अमीष दाखवून लुबाडले असलेबाबत तपास सुरु आहे.

नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगता अशा प्रकारे शरिरसंबधाचे अमिष दाखवून अश्लील व्हीडीओ बनवुन त्याची धमकी देवुन लुट झाल्यास अथवा पैशांची मागणी केली असल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक  मनोज पाटील यांनी केले आहे.

पुढील तपास निरीक्षक राजेंद्र सानप हे करीत आहेत.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक  मनोज पाटील , अपर पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागिय पोलीस अधीकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप व पथकातील उपनिरीक्षक आर.एन. राऊत, हेडकोन्स्टेबल बापुसाहेब फोलाणे, भगवान गांगडे, शैलेष सरोदे, संतोष लगड, योगेश ठाणगे, अशोक मरकड, धर्मनाथ पालवे, प्रमीला गायकवाड, पो. कॉ. धर्मराज दहिफळे, संभाजी बोराडे, गायत्री धनवडे, मोहीनी कर्डक, राजश्री चोपडे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment