शिर्डी शहरातील हॉटेल, लॉजिंग, रेस्टॉरंट, व्यावसायिकांनी लाईट बिल कमी करण्यासाठी या योजनेचा फायदा घ्यावा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 25, 2021

शिर्डी शहरातील हॉटेल, लॉजिंग, रेस्टॉरंट, व्यावसायिकांनी लाईट बिल कमी करण्यासाठी या योजनेचा फायदा घ्यावा

 शिर्डी शहरातील हॉटेल, लॉजिंग, रेस्टॉरंट, व्यावसायिकांनी लाईट बिल कमी करण्यासाठी या योजनेचा फायदा घ्यावा


नगरी दवंडी

शिर्डी प्रतिनिधी : 

कोरोना महामारीचे पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने दुसऱ्यांदा लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे शिर्डी शहरातील सर्व उद्योग व्यवसाय ठप्प झालेला आहे. यातच लॉकडाऊन कधी संपेल आणि साई मंदिर कधी उघडेल हे सांगता येत नाही. या सर्व प्रकारामध्ये शिर्डी शहरामध्ये मोठया प्रमाणात असणाऱ्या हॉटेल/लॉजिंग व रेस्टारंटचा व्यवसाय करणाऱ्या नागरिकांची प्रचंड आर्थिक कुचम्बना झाली आहे. सर्वकाही बंद असतांनाही महावितरणकडून हजारो रुपयांचे बिले महिन्याकाठी येत आहेत. हॉटेल व्यवसाय ज्यावेळी सुरक्षित होता. त्यावेळेस लागणाऱ्या भारापायी योग्य होते. परंतु आज त्याचा उपयोग नसतानाही तितकेच बिल आकारले जात आहे. हि बाबी मा.आ.राधाकृष्ण विखे पाटील व मा.खा सुजय विखे पाटील यांचे निदर्शनास आणून दिली असता त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर लॉकडाऊन संपेपर्यंत सध्या मंजूर असलेला वीजभार हा तात्पुरता स्वरूपात कमी करून मिळावा असा अर्ज जर आम्हाला केला. तर आम्ही तो भार कमी करू त्याचा परिणाम वीजबिल कमी होण्यात होईल. अशी चर्चा झाली. माननीय नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी शिर्डी शहरातील सर्व व्यवसायिक बांधून असे आवाहन केले कि ज्यांचा मंजूर विद्युत भार हा २० KV पेक्षा जास्त आहे अशा व्यवसायिकांनी शिर्डी नगरपंचायतमधील विद्युत विभागात छापील अर्ज व त्यासोबत लाईट बिलाची झेरॉक्स प्रत सोबत जोडून द्यावी. त्यानंतर आपला विद्युत भार कमी करण्यासाठी नगर पंचायतीचे वतीने प्रयत्न केले जाणार आहेत. पुढील काळात सर्व व्यवसायिकाना आपला वीजभार पूर्ववत करून घ्यावा लागेल. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने अर्ज करून आपले वाणिज्य वापर असलेले वीजबिल कमी करुन घ्यावे  असे आवाहन नगराध्यक्ष गोंदकर यांनी केले. यावेळी झालेल्या चर्चेत भाजपाचे शहराध्यक्ष सचिन शिंदे, गटनेते अशोक गोंदकर, मंगेश त्रिभुवन, दीपक वारुळे, दत्तू गोंदकर, बापू ठाकरे, राजू गोंदकर आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment