कान्हूर पठार पतसंस्थेचे कार्यकारी संचालक दिलीप ठुबे यांचे निधन ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, May 25, 2021

कान्हूर पठार पतसंस्थेचे कार्यकारी संचालक दिलीप ठुबे यांचे निधन !

 कान्हूर पठार पतसंस्थेचे कार्यकारी संचालक दिलीप ठुबे यांचे निधन !

पारनेर तालुक्याने सहकार क्षेत्रातील मोठा अनुभव असलेले व्यक्तिमत्त्व गमवले नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यात अग्रगण्य समजल्या जाणार्‍या पारनेर तालुक्याची अर्थवाहिनी असलेल्या कान्हूर पठार पतसंस्थेचे कार्यकारी संचालक दिलीप ठुबे यांचे नुकतेच पुणे येथे उपचार चालू असताना निधन झाले आहे.

 पारनेर तालुक्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रात ते कार्यरत होते.  कोरोना नंतर त्यांना म्युकरमायकोसीस या आजाराने ग्रासले. त्यांच्यावर पुणे येथील रुबी हॉल क्लीनकमध्ये उपचार चालू होते. उपचारांना ते  चांगला प्रतिसाद देत होते. मात्र, सकाळी त्यांची प्रकृती ढासाळली आणि त्यातच दुपारी त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या निधनाने पारनेर तालुक्यातील महत्त्वपूर्ण अर्थवाहिनी असलेली संस्था कान्हूरपठार पतसंस्था परिवाराची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या रूपाने सहकार आणि पतसंस्था चळवळीला मोठा अनुभव असलेला व्यक्तिमत्व पारनेर तालुक्याने गमावले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here