कोरोनातील व्यवस्थापन जिल्हा आरोग्य विभागाकडेच द्यावे ः पोटे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 19, 2021

कोरोनातील व्यवस्थापन जिल्हा आरोग्य विभागाकडेच द्यावे ः पोटे

 कोरोनातील व्यवस्थापन जिल्हा आरोग्य विभागाकडेच द्यावे ः पोटे

जनआधार सामाजिक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन 


नगरी दवंडी/प्रतिनिधी

अहमदनगर ः जिल्हा शासकीय आरोग्य व्यवस्थेचे कोरोना काळातील व्यवस्थापन हे जिल्हा आरोग्य विभागाकडे देण्याच्या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत शहराध्यक्ष शहानवाज शेख, अमित गांधी, दीपक गुगळे, वसीम शेख, गणेश निमसे आदी उपस्थित होते.  
मागील वर्षापासून कोरोनाने संपूर्ण जगभरासह नगर जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणावर थैमान घातलेले आहे त्यामुळे आधीच मनुष्यबळ कमी असणारी शासकीय आरोग्य यंत्रणा ही कोविड-19 च्या संकटाने व्हेंटिलेटरवर गेलेली आहे. त्यामध्ये मागील काही दिवसांपासून जिल्हा किंवा तहसील विभागाकडून वारंवार विविध प्रकारचे आदेश,हे कुठल्याही ग्राऊंड लेव्हल ची सत्य परिस्थिती समजाऊन न घेता केवळ आकडे-मोडी साठी आरोग्य यंत्रनेस देत आहेत.सदरचे विभाग फक्त आदेश देत असले तरी अखेर स्वतःचा जीव धोक्यात घालून ग्राउंड लेव्हल वर खरं काम हे आरोग्य यंत्रनेतील लोकांनाच करावं लागतं आहे.मागील हप्त्यात तहसील तसेच जिल्हास्तरावरून आरोग्य यंत्रनेस कोरोना लसीकरणा सोबत आरोग्य केंद्र सांभाळून त्या व्यतिरिक्त कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग अतिरिक्त 100 आरटीपीसीआर टेस्ट तसेच अंटिजेन टेस्ट करण्याचे टार्गेट जिल्हा/तहसील,यंत्रने कडून,आरोग्य विभागाला देण्यात आले आहे.तसे न झाल्यास त्या डॉक्टर ला संध्याकाळी 7 वाजताच्या व्हीसीला वरीष्ठ अधिकार्‍यां सह जवाब देण्या साठी बसविण्यात  जिल्हा/तहसील यंत्रणेला हे माहीत आहे का ? की आधीच लसीकरण,आरोग्य केंद्र सांभाळतांना,असे वेगवेगळे टार्गेट करण्यास ही मोडकळीस आलेली यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे का?त्यांना अतोनात होणारी गर्दी,त्यातून होणारी भांडण हे सांभाळण्यासाठी सुरक्षा व्यवस्था आहे का, वाहतुकीसाठी,लॅब साठी ,डेटा ऑपरेटर साठी पुरेस मनुष्य बळ आहे का ? आरोग्य केंद्रावर लसीकरण करत असताना, त्या सोबत इतरही अन्य आजाराचे रुग्ण येत असतात,त्याच बरोबर तेथे आलेल्या लोकांचे आरटीपीसीआर टेस्ट/अँटीजन टेस्ट घेणे हेही काम असते जर त्यांना वरच्या यंत्रणेने आणखी  टेस्टच टार्गेट दिले आहे तर हे टार्गेट होईलच कसे ? याचा अर्थ त्यांनी दिवसभर लसीकरन तसेच आरोग्य केंद्र सांभाळून देखील या दिलेल्या टार्गेट साठी रात्री रोडवर फिरले पाहिजे का ?  आधीच मोडकळीला आलेली यंत्रणा हे सहन तरी कसे करणार ? आपण शासकीय आरोग्य व्यवस्थेचे यापुढील

संपूर्ण नियोजन हे जिल्हा आरोग्य अधिकारी, तसेच जिल्हा सिव्हिल सर्जन आणि तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे द्यावे जेणेकरून ते या विभागांमध्ये तंत्रज्ञ असल्यामुळे ते त्यातील त्रुटी/कमतरता, जाणतील.आणि कमी पडणारे मनुष्य बळ उपलब्ध करून देतील.आणि त्या नंतर त्यांना त्या नुसार टार्गेट देतील. तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चे काम हे काम आपण गाव पातळीवर तेथील तलाठी ग्रामसेवक किंवा शिक्षक यांच्या माध्यमातून ही करू शकतो परंतु वरील अतिरिक्त कामाचा बोजा जो आपण आरोग्य यंत्रनेवर दिलेला आहे तो पूर्ण होईल यात शंकाच  आपण या अडचणी मध्ये लक्ष घालावे अन्यथा जन आधार संघटनेच्या माध्यमातून आम्ही सर्व आरोग्य कर्मचार्‍यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून  विरोधात दर्शुन रस्त्यावर उतरून आंदोलन करू असे निवेदनात म्हंटले आहे. 

No comments:

Post a Comment