कोरोना काळात बेरोजगारांना रोजगाराची संधी देऊ : गिरमे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 19, 2021

कोरोना काळात बेरोजगारांना रोजगाराची संधी देऊ : गिरमे

 कोरोना काळात बेरोजगारांना रोजगाराची संधी देऊ : गिरमे


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः कोरोनाचे तांडव सद्या सर्वत्र असल्याने नाईलाजाने लॉकडाऊन आणि त्यामुळे बंद ठेवण्यातआलेले व्यवसाय अशी सर्वत्र स्थिती असल्याने लोकाच्या रोजगारावरच गदा आली आहे आणि त्यामुळे घरा-घरात होणारी कुचंबना अशीच शहरासह जिल्ह्याची अवस्था आहे . लॉकडाऊन आणि मास्कसह  सुरक्षतेचे सर्व नियम पाळून बेरोजगाराना रोजगाराची संधी मिळाल्यास घरा-घरातील रोजी - रोटीचा प्रश्न कमी होऊन आपण कोरोनावर मात करण्यासाठी अधिक सक्षम ठरु असे मत ओ बी सी 12 बलुतेदार महासंघाच्या युवा शाखेचे जिल्हाध्यक्ष आर्यन गिरमे यांनी व्यक्त केले.                
 कोरोनाकाळात अनेकांचे रोजगार संपृष्टात आले आहेत,अनेकांना काम सोडावे लागले अशा बेरोजगार ठरलेल्यांना कामाची खूप गरज असल्याने या गोष्टीचा विचार करून त्यांना एम आय डी सी मध्ये रोजगार मिळवून देण्याचा  निर्णय श्री.गिरमे यांनी घेतला असून,महासंघाचे नेते जिल्हाध्यक्ष माऊली मामा गायकवाड,जि.उपाध्यक्ष अनिल इवळेसह पदाधिकारी,सदस्य या उपक्रमात हातभार लावणार आहे तर ओ बी सी ,व्हि-जे,एन.टी.जनमोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळसह संघटनेचे सहकार्य आपल्याला मिळते,असा विश्वास श्री.गिरमे यांनी यावेळी व्यक्त केला.                                        
 बेरोजगारांच्या हाताला काम देण्यांची ही योजना तशी पर्यायी असणार आहे.सद्या सर्व दुकाने आणि कमर्शिअल वर्क थांबलेले असून सर्वसामान्यांचे त्पामुळे हाल होतात  त्यांच्यासाठी ही योजना पर्यायी व्यवस्था ठरणार आहे तशी मानसिकता सर्वांचीच असून ही योजना नियोजनपूर्वक राबवून लॉकडाऊन काळातही सर्व नियम पाळून बेरोजगारांना रोजगार प्राप्त होऊ शकतो त्यादृष्टीने योजना हाती घेण्यांत आली आहे तरी संबधितांनी 9657344143 या मोबाईल क्रमांकावर अथवा  संघटनेच्या पदाधिकार्यांशी  संपर्क करण्याचे  आवाहन श्री गिरमे यांनी यावेळी केले.  

No comments:

Post a Comment