काळाबाजार होऊ नये म्हणून म्यूकर माइकोसिसचे ’अँफोनेक्स’ इंजेक्शन जिल्हाधिकार्‍यांमार्फत पेशंटला द्यावे ः शेख - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, May 19, 2021

काळाबाजार होऊ नये म्हणून म्यूकर माइकोसिसचे ’अँफोनेक्स’ इंजेक्शन जिल्हाधिकार्‍यांमार्फत पेशंटला द्यावे ः शेख

 काळाबाजार होऊ नये म्हणून म्यूकर माइकोसिसचे ’अँफोनेक्स’ इंजेक्शन जिल्हाधिकार्‍यांमार्फत पेशंटला द्यावे ः शेख


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः येथील ऑल इंडिया युथ फेडरेशनचे शहरजिल्हाध्यक्ष फिरोज़ चाँद शेख यांनी नुकतीच जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र ब.भोसले यांच्याकडे नागरी आरोग्यविषयक महत्वाची मागणी केलेली आहे.
ते आपल्या मागणीपत्रात म्हणतात कि, अहमदनगर शहरांमध्ये नवीन आजार म्यूकर... माइकोसिस (लश्ररलज्ञ र्षीपर्सीी) चे काही पेशंट आढळून आले आहेत. त्या पेशंट करिता ’अँफोनेक्स’ (चझकजछएद) इंजेक्शनची औषधोपचारासाठी गरज असते. त्याचा फार तुटवडा निर्माण झालेला आहे. मेडिकल मार्केटमध्ये ’अँफोनेक्स’ (चझकजछएद) इंजेक्शन फार कमी प्रमाणात उपलब्ध आहे. या रोगाचे पेशंट व उपलब्धता पहाता त्याचाही काळाबाजार होण्याची फार शक्यता दिसून येत आहे.
त्याकरिता आम्ही आपल्याला मागणी करत आहोत की, ’अँफोनेक्स’ (चझकजछएद) इंजेक्शन आपण जिल्हाधिकारी म्हणून ताब्यात घेऊन आपल्याच कार्यालयामार्फत थेट पेशंट व संबंधित हॉस्पिटलला द्यावेत. जेणेकरून रूग्णांची हेळसांड होणार नाही, काळाबाजार होणार नाही व त्वरीत उपलब्ध होईल.
हे सर्व आपल्या नियंत्रणात राहून पेशंटच्या नातेवाईकांना जो त्रास होणार आहे ते कुठेतरी थांबले आणि आपल्यामार्फत योग्य न्याय मिळेल असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here