जामखेडला दहा मे ते वीस मे पर्यत कडकडीत जनता कर्फ्यू.... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, May 7, 2021

जामखेडला दहा मे ते वीस मे पर्यत कडकडीत जनता कर्फ्यू....

 जामखेडला दहा मे ते वीस मे पर्यत कडकडीत जनता कर्फ्यू....

 


नगरी दवंडी

जामखेड - वाढत्या कोराना संसर्गाला आळा घालण्यासाठी कर्जत जामखेडच्या प्राताधिकारी अर्चना नष्टे तहसिलदार विशाल नाईकवाडे तालुक्यातील सर्वच प्रशासकीय अधिकारी व्यापारी व सामाजिक क्षेत्रातील व्यकतीसह सह राजकीय पक्ष व संघटना प्रमुखांच्या उपस्थित आज झालेल्या बैठकीत दि दहा मे ते वीस मे पर्यत जामखेड शहरात कडकडीत जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने आता दहा मे ते वीस मे पर्यत जनता कर्फ्यूचे सर्वाना पालन करावे लागणार आहे

जामखेड तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्याने कर्जत जामखेडच्या प्राताधिकारी अर्चना नष्टे यांनी आज जामखेड येथील तहसील कार्यालयात सर्व शासकिय विभागाच्या विभाग प्रमुख राजकीय सामाजिक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व्यापारी आणी पत्रकारांच्या उपस्थित या संदर्भात घेतलेल्या बैठकीदरम्यान जामखेड शहरात वाढत्या कोरोना संसर्गास रोखण्यासाठी दि. दहा मे ते वीस मे दरम्यान संपूर्ण जामखेड शहरात जनता कर्फ्यू लावण्यात येणार असुन त्याचे सर्वानी काटेकोर पणे पालन करण्याचे ठरले असून फकत अत्यावश्यक सेवेत दुध दुकाने सकाळी सात ते अकरा चालु राहतील तसेच वैद्यकीय सेवेतील मेडीकल स्टोअर्स व दवाखान्य नियमीत वेळेत सेवा देतील असा निर्णय झाला असल्याने पुढील येत्या काळात तरी कोरोना संसर्ग कमी होईल अशी अपेक्षा ठेऊ यात यावेळी या बैठकीलामा. तहसीलदार विशाल नाईकवाडे,पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, रमेशदादा आजबे, सभापती सुर्यकांत नाना मोरे, मंगेश दादा आजबे संजय काका काशिद व्यापारी भोसले तोडकरी तसेच पत्रकार अध्यक्ष नासीर पठाण अविनाश बोधले, अशोक वीर, अजय अवसरे, पप्पुभाई सय्यद आदि उपस्थित होते.तसेच प्राताधिकारी अर्चना नष्टे सह इतरांनी आप आपल्या प्रतिक्रिया दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here