मनपा आयुक्तांच्या ठोस आश्वासनानंतर काँग्रेसचे आंदोलन स्थगित - किरण काळे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 7, 2021

मनपा आयुक्तांच्या ठोस आश्वासनानंतर काँग्रेसचे आंदोलन स्थगित - किरण काळे

 मनपा आयुक्तांच्या ठोस आश्वासनानंतर काँग्रेसचे आंदोलन स्थगित - किरण काळेनगरी दवंडी

महानगर पालिका आयुक्तां समवेत काँग्रेस शिष्टमंडळाची जंबो ऑक्सिजन कोविड सेंटर संदर्भामध्ये सविस्तर चर्चा झाली. काँग्रेसच्या वतीने महापालिकेला एकाच वेळी, एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरू करणे शक्य नसेल तर मनपाचे आत्ताच चालू असणारे जे कोविड केअर सेंटर आहेत त्यातीलच सध्या रिकामे असणारे बेड हे ऑक्सिजन बेड मध्ये रुपांतरीत करण्यात यावे आणि टप्प्याटप्प्याने त्यांची संख्या वाढवत न्यावी असा पर्याय सुचविण्यात आला. यावर आयुक्तांनी या बाबतीमध्ये ठोस आश्वासन काँग्रेस शिष्टमंडळाला दिले आहे की, आम्ही महानगरपालिकेच्या वतीने ऑक्सीजन बेड नागरीकांसाठी उपलब्ध करण्यासाठी तातडीने आवश्यक ती पावले उचलू. आयुक्तांच्या या आश्‍वासनानंतर आम्ही आंदोलन स्थगित करत असल्याचे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment