अमरधाममध्ये कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार्‍या कंत्राटी कामगारांना महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी द्यावी - धनंजय जाधव - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, May 3, 2021

अमरधाममध्ये कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार्‍या कंत्राटी कामगारांना महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी द्यावी - धनंजय जाधव

 अमरधाममध्ये कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार्‍या कंत्राटी कामगारांना महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी द्यावी - धनंजय जाधवनगरी दवंडी

अहमदनगर/प्रतिनिधी- अमरधाममध्ये कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार्‍या कंत्राटी कामगारांना महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी देण्याची मागणी माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी केली आहे. याबाबत मनपा आयुक्त शंकर गोरे यांना जाधव यांनी निवेदन दिले आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे अनेक लोकांचे जीव जात आहेत. जीव गेलेल्या मृतदेहाजवळ वा त्याला पाहण्यासाठी घरातील नातेवाईक देखील बघण्यास येत नाहीत. अशा स्थितीत महापालिकेच्यावतीने मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात, ही चांगली बाब आहे.तसेच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जे कंत्राटी पद्धतीने कामगार ठेवले आहेत, ते कामगार आपल्या जीवांची पर्वा न करता अतिशय चोख पद्धतीने आपले कर्तव्य पार पाडत आहे. त्यामुळे त्या कामगारांना कोरोनाच्या महामारीत उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना आपल्या महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी देण्यासाठी शासनाकडे शिफ़ारस करावी तसेच त्यांचा विमा काढावा, अशी मागणी जाधव यांनी यात केली आहे.

हेत. जीव गेलेल्या मृतदेहाजवळ वा त्याला पाहण्यासाठी घरातील नातेवाईक देखील बघण्यास येत नाहीत. अशा स्थितीत महापालिकेच्यावतीने मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात, ही चांगली बाब आहे. तसेच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जे कंत्राटी पद्धतीने कामगार ठेवले आहेत, ते कामगार आपल्या जीवांची पर्वा न करता अतिशय चोख पद्धतीने आपले कर्तव्य पार पाडत आहे. त्यामुळे त्या कामगारांना कोरोनाच्या महामारीत उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना आपल्या महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी देण्यासाठी शासनाकडे शिफ़ारस करावी तसेच त्यांचा विमा काढावा, अशी मागणी जाधव यांनी यात केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here