लाच घेणाऱ्या त्या तीन पोलिसांवर गुन्हा दाखल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 3, 2021

लाच घेणाऱ्या त्या तीन पोलिसांवर गुन्हा दाखल.

 लाच घेणाऱ्या त्या तीन पोलिसांवर गुन्हा दाखल.नगरी दवंडी

शेवगाव - पकडलेला वाळूचा ट्रक कारवाई न करता सोडून देण्यासाठी व वाळू वाहतुकीसाठी ट्रक चालू देण्यासाठी हप्ता म्हणून १५हजार रुपयांची लाच मागणाऱ्या 1.वसंत कान्हु फुलमाळी, पो कॉन्स्टेबल, ब.न.1808, वर्ग 3 नेमणूक -उप विभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव यांचे वायरलेस ऑपरेटर ( RTPC ) राहणार- शंकर नगर पाथर्डी, जि. अहमदनगर,2. संदिप वसंत चव्हाण, पो कॉन्स्टेबल, ब.न. 566, वर्ग-3,नेमणूक - पाथर्डी पोलीस स्टेशन, सध्या संलग्न उप विभागीय पोलीस अधिकारी शेवगाव यांचे पथक राहणार - पोलीस वसाहत शेवगाव, जि. अहमदनगर,3.कैलास नारायण पवार पो. कॉन्स्टेबल, ब.न.2798, वर्ग -3नेमणूक-शेवगाव पोलीस स्टेशन, सध्या संलग्न - उप विभागीय पोलीस अधिकारी शेवगाव यांचे पथक. राह- शंकर नगर पाथर्डी या तिन्ही पोलिसांवर आज शेवगाव पोलीस स्टेशनला  गुन्हा दाखल करण्यात आला आहे

यातील तक्रारदार यांची वाळूची ट्रक उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव श्री सुदर्शन मुंढे यांच्या पथकातील कार्यरत वरील नमूद तिन्ही लोकसेवक यांनी दि.7/4/2021 रोजी पकडली होता.त्या ट्रकवर कारवाई न करता सोडण्याचे मोबदल्यात व वाळु वाहतुकीसाठी ट्रक चालू देण्यासाठी हप्ता म्हणून दि.07/04/2021 रोजी आयोजित लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान वरील नमूद तिन्ही लोकसेवक यांनी पंचा समक्ष तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती 15000/- रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली त्यामुळे आज रोजी सदर आरोपी विरुद्ध शेवगाव पो स्टे येथे गुन्हा दाखल केला असून नमूद आरोपी लोकसेवक फरार आहेत, त्यांचा शोध चालू आहे.

सदर कारवाई सापळा अधिकारी श्याम पवरे,पोलीस निरीक्षक ला.प्र.वि.अहमदनगर,पर्यवेक्षण अधिकारी हरिष खेडकर,पोलीस उप अधीक्षक ला.प्र.वि.अहमदनगर यांनी केलीी पोलीस उपाधीक्षकांच्या पथकातील तीन पोलिसांवर लाच मगितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

No comments:

Post a Comment