कोरोनावर मात करण्यात रूई छत्तीसी परिसर अव्व्ल..! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, May 17, 2021

कोरोनावर मात करण्यात रूई छत्तीसी परिसर अव्व्ल..!

 कोरोनावर मात करण्यात रूई छत्तीसी परिसर अव्व्ल..!

 तपासणी व लसीकरणाचा परिणाम l माजी उपसभापती भापकर  ऍक्टिव्ह मोडमध्ये


नगरी दवंडी / अविनाश निमसे

अहमदनगर :  नगर तालुक्यात सध्या कोरोना बधितांचा उच्चांक सुरु असताना तालुक्यातील रुईछत्तीसी परिसर मात्र कोरोनावर मात करण्यास अव्वल ठरला आहे. नगर तालुक्यात एकूण नऊ आरोग्य केंद्र आहेत. त्यात सर्वात कमी रुग्ण संख्या ही रुई छत्तीसी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत (877) आढळून आली आहे. याशिवाय वाटेफळ, अंबिलवाडी, मठपिंपरी,वडगाव तांदळी, दहिगाव साकत, पारगाव ही गावे कोरोना मुक्तीच्या वाटेवर आहेत.

 रुई छत्तीसी परिसरातील जनतेला साथ देण्यासाठी माजी सभापती रवींद्र भापकर हे सतत एक्टिव्ह मोडमध्ये असल्याने परिसरातील जनतेमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मार्च एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच भापकर यांनी लोकप्रतिनिधी व शासन यांचा समन्वय साधून जनता कर्फ्यूची जोड देत ट्रेसिंग, टेस्टिंग, व ट्रीटमेंट च्या त्रिसूत्रीने कोरोना नियंत्रणात आणला. परिसरातील प्रत्येक गावात समक्ष भेटी देऊन रॅपिड टेस्ट घेण्यावर भर दिला तसेच लसीकरणात सुसूत्रता आणली. त्यामुळे रुग्ण साखळी तुटत गेली. जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले त्यांना कोव्हीड सेंटर, शासकीय, खासगी हॉस्पिटल येथे रुग्णवहीका बोलवून पाठविण्यात आले.याकामी त्यांना आजही माजी जि. प.सदस्य बाळासाहेब हराळ, किरण भापकर, आरोग्य अधिकारी सविता ससाणे यासह आरोग्य केंद्रातील कर्मचारी, परिसरातील ग्रामस्थ आदींची साथ लाभत आहे. परिसरातील ग्रामस्थही नियमांचे पालन करत असून मे अखेरीस परिसरातील गावे कोरोनामुक्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत.

तालुक्यातील एकूण आरोग्य केंद्रे -: 9

रुई केंद्रान्तर्गत येणारी गावे - :13

एप्रिल पर्यंत रुग्ण -:727

मे महिन्यातील रुग्ण -: 150

एकूण रुग्ण संख्या -: 877

सक्रिय रुग्ण -: 90

बरे झालेले रुग्ण -: 777

मृत्यू -: 10 (तालुक्यात सर्वात कमी )


"रुई छत्तीसी परिसरातील गावागावात आरोग्य विभाग व स्थानिक कमिटी यांचा समन्वय साधून कोरोना तपासणी व लसीकरण यात सुसूत्रता आणली. कोरोना काळ असेल किंवा विकास कामे असतील त्यामध्ये आम्ही सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य जनतेच्या सेवेसाठी सर्वोतोपरी मदत करत होतो आणी यापुढेही करत राहणार. "

-  रवींद्र भापकर, माजी उपसभापती

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here