नगर तालुक्यालाही चक्रीवादळाचा तडाखा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 18, 2021

नगर तालुक्यालाही चक्रीवादळाचा तडाखा

 नगर तालुक्यालाही चक्रीवादळाचा तडाखा

फळबागांचे नुकसान l कांदा झाकवण्यासाठी शेतकऱ्यांची पळापळ  



नगरी दवंडी / प्रतिनिधी 

अहमदनगर  : तैक्त्यो चक्रीवादळाचा नगर तालुक्यातील बहुतांशी भागाला तडाखा बसला. उन्हात सुकवण्यासाठी ठेवलेल्या कांद्याचे नुकसान झाले. तसेच  फळबागांचेही नुकसान झाले.तालुक्यात दोन दिवसांपासुन वीज गायब असल्याने सर्वानांच या वादळाचा फटका सहन करावा लागला.

नगर तालुक्यात सध्या खरीप हंगामासाठी शेतकरी शेतीची मशागत करीत आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांचा कांदा शेतातच होता. चक्रीवादळाने पावसाची शक्यता निर्माण झाल्याने कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच पळापळ झाली तर वादळाने  कागद उडाल्यामुळे काहींचा कांदा भिजला.

तसेच आंबा, लिंबू, चिकू यासारख्या फळांचेही नुकसान झाले. वादळाने तालुक्यात दोन दिवसांपासुन विजेचा लपंडाव सुरु झाल्याने विजेअभावी लोकांना विविध प्रश्नांना सामोरे जावे लागले.


नगर शहरालाही बसला फटका- 

नगर शहरांमध्येही तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.कानडेमळा येथील शेतकरी सदाशिव भाऊसाहेब निस्ताने यांच्या ३० म्हशी भिंगारनाल्या मध्ये पाणी पिण्यासाठी गेल्या असताना या चक्रीवादळामुळे विजेच्या तार तुटून विजेचा  झटका या म्हशींना बसला व त्या जागीत ठार झाल्या . त्यामुळे या शेतकऱ्याचा सुमारे ९ते१० लाख रुपयेचे नुकसान झाले. यावेळी आ. संग्राम जगताप यांनी तहसीलदार तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पंचनामा करण्याच्या सूचना दिल्यानंतर तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या . सुदैवाने याठिकाणी कुठलीही जीवित हानी झाली नाही तसेच आपल्यावर आलेल्या नैसर्गिक आपत्तीची भरपाई शासनाकडून तातडीने मिळवून देण्यात यावी अशी मागणी नगरसेवक प्रकाश भागानगरे व शेतकरी सदाशिव निस्ताने यांनी आहे.


उन्हाळात अचानक आलेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे फळबागा, कांदा, भाजीपाला, उन्हाळा हंगामातील पिकाचे अतोनात नुकसान झाले. यावर्षी दर आठवड्याला सातत्याने वादळी पाऊस येत असल्या कारणाने शेतकऱ्यांची पिके धोक्यात होती आणि या वादळाने आणखी नुकसान झाले आहे. कोरोना मुळे बाजारपेठा बंद असल्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्टया खूप अडचणीत आहे त्यात ह्या संकटामुळे त्यात आणखी वाढ झाली आहे. " -

रमेश राधाकृष्ण ठोंबरे ( शेतकरी , वडगाव तांदळी , नगर )


No comments:

Post a Comment