ती फाईल भुतांनी पळवली का? सेनेची राज्यपालांवर टीका - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 24, 2021

ती फाईल भुतांनी पळवली का? सेनेची राज्यपालांवर टीका

 ती फाईल भुतांनी पळवली का? सेनेची राज्यपालांवर टीका

नवी मुंबई ः  मागच्या सहा महिन्यांपासून 12 आमदारांची यादी राजभवनात आहे त्यावर अद्याप राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कोणताही निर्णय न घेतल्याने शनिवारी मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा यावरून राज्यपाल यांना प्रश्न विचारले होते. तर आता शिवसेनेने आपला मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून राज्यपालावर टीका केली आहे. राज्यपालांनी करावीत अशी अनेक कामे आहेत. फायलींवर बसून राहण्यापेक्षा ही कामे केल्याने त्यांचा नावलौकिक वाढेल. महाराष्ट्रात लसीचा तुटवडा आहे. याबाबत राज्यपालांनी केंद्राकडे पाठपुरावा केला पाहिजे. ‘तौकते’ चक्रीवादळात नुकसान झाले. पंतप्रधानांनी गुजरातच्या वादळग्रस्तांना हजार कोटी दिले. मग महाराष्ट्रावर अन्याय का करता? माझ्या राज्यालाही पंधराशे कोटी द्या, अशी मागणी करून राज्यपालांनी ‘मर्‍हाटी’ जनतेची मने जिंकली पाहिजेत. हे सर्व करायचे सोडून राज्यपाल सहा महिन्यांपासून एका फाईलचे राजकारण करीत आहेत. आता तर ती फाईलही भुतांनी पळविली. राजभवनात अलीकडे कोणत्या भुताटकीचा वावर वाढला आहे? एकदा शांतीयज्ञ करून घ्यावा लागेल, असा सणसणीत टोला शिवसेनेनं  लगावला आहे.

No comments:

Post a Comment