श्रीगोंदा शहरात विनाकारण फिरणार्‍यांची कोरोना चाचणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, May 22, 2021

श्रीगोंदा शहरात विनाकारण फिरणार्‍यांची कोरोना चाचणी

 श्रीगोंदा शहरात विनाकारण फिरणार्‍यांची कोरोना चाचणी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
श्रीगोंदा ः
श्रीगोंदा तालुक्यात दररोज कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असताना देखील नागरीक शासकीय नियमानाचे पालन न करता विना मास्क, तसेच विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याने श्रीगोंदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी आपल्या कर्मचार्‍यांसह विनाकारण फिरणार्‍यां नागरीकांची कोरोना चाचणी केली. तर शहरात 4 विनापरवानगी चालु असलेल्या दुकानांवर कारवाई करत 2 दुकानांना प्रत्येकी 10 हजाराचा दंड करण्यात आला तर दोन दुकाने सील करण्यात आले.
श्रीगोंदा नगरपालिका तसेच श्रीगोंदा पोलिस स्टेशन यांनी कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी रस्त्यावर विनाकारण फिरत असलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्याची मोहिम राबविली. यात आज दिवसभरात 100 नागरिकांची चाचणी घेण्यात आली, त्यात 1 जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. शहरात कोरोना चाचणीची मोहीम राबवताच कामाव्यतिरिक्त मोकाट फिरणार्‍या नागरिकांची संख्या कमी होत असल्याची प्रतिक्रिया नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी दिली. या मोहिमेत मुख्याधिकारी मंगेश देवरे, पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, उपनगराध्यक्ष रमेश लाढाणे, वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन खामकर, डॉ. संघर्ष राजुळे, लॅब टेक्निशियन जगन्नाथ फाटे, सारीक शेख, गलांडे मैडम, नगरपालिका कर्मचारी, पोलिस कर्मचारी, पोलिस मित्र, होमगार्ड आदी सहभागी होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here