किन्ही येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबीर संपन्न ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, May 30, 2021

किन्ही येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबीर संपन्न !

 किन्ही येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबीर संपन्न !

पहिल्या टप्प्यात १७२ नागरिकांना लस देण्यात आली.



नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी :-

तालुक्यातील किन्ही ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून आरोग्य विभागाच्या वतीने शनिवार दिनांक २९ मे रोजी किन्ही , बहिरोबावाडी येथील ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबीर घेण्यात आले.या शिबीरात १७२ नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस देण्यात आला असल्याची माहिती शेतकरी नेते तथा ग्रामपंचायत सदस्य अनिल देठे पाटील यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

मागील महिनाभरापासून किन्ही येथील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली होती त्या पार्श्वभूमीवर किन्ही ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.पुष्पा शिवाजी खोडदे , उपसरपंच हरेराम खोडदे , ग्रामसेवक संजय घोलप व ग्रामपंचायत सदस्यांनी आरोग्य विभागाकडे किन्ही , बहिरोबावाडी गावातील नागरिकांसाठी तातडीने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबीर घेण्यात यावे अशी पञाद्वारे मागणी केली होती तथापि राज्यात लसीचा तुटवडा असल्याने लसीकरण शिबीर घेण्यात प्रचंड अडचणी येत होत्या माञ शेतकरी नेते अनिल देठे पाटील व उपसरपंच हरेराम खोडदे यांनी आरोग्य विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवल्याने अखेर शनिवारी किन्ही येथे करंदी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे समुपदेशन अधिकारी डॉ तुषार धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबीर घेण्यात आले.या शिबीरास गावातील नागरिकांमधून उदंड प्रतिसाद मिळाला.यादरम्यान १७२ नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस देण्यात आला.हे लसीकरण यशस्वीपणे पार पाडण्यासाठी करंदी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील श्री आकाश चंदेला , आरोग्य सेविका श्वेता डहाळे , श्रीमती देशमाने , श्रीमती प्रियंका धुमाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.यादरम्यान नागरिकांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी किन्ही गावातील युवा कार्यकर्ते इंजि.श्रीकांत निमसे , माध्यमिक विद्यालयाचे शिपाई श्री अनिल दिघे मामा यांनी विशेष सहकार्य केले.तसेच नागरिकांनी गर्दी करू नये व लसीकरण सुरळीत पार पडावे यासाठी माध्यमिक विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक कर्ण रोकडे , अंगणवाडी सेविका सौ.सुनिता साकुरे , सौ.संगिता व्यवहारे , सौ.स्वाती खोडदे आशासेविका सौ.मंगल व्यवहारे , सौ.छाया खोडदे , शुभम भागवत , जयसिंग खोडदे , शरद व्यवहारे , किरण खोडदे , बाबासाहेब व्यवहारे , भिका आरेकर , होम गार्ड शिपाई श्री बुगे यांनी विशेष प्रयत्न केले.

लसीच्या उपलब्धतेनुसार किन्ही व बहिरोबावाडी गावातील सर्व नागरिकांचे लसीकरण टप्प्याटप्प्याने पुर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत राहणार आहोत. लसीचा प्रचंड तुटवडा असुन देखील पहिल्या टप्प्यात १७२ नागरिकांना लस देऊ शकलो याचे आत्मिक समाधान लाभले.-अनिल देठे पाटील ( शेतकरी नेते )

किन्ही येथील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आमच्या मागणीवरून आरोग्य विभागाने दोन वेळा कोरोना चाचणी शिबीरे व आता लसीकरण शिबीर किन्ही येथे घेतल्याबद्दल आरोग्य विभाचे विशेष आभार -- पुष्पा खोडदे ( सरपंच  -- हरेराम खोडदे ( उपसरपंच )

No comments:

Post a Comment