समाज अडचणीत असताना आमदार नीलेश लंके करीत असलेले काम शरद पवारांच्या धोरणानुसार ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, May 30, 2021

समाज अडचणीत असताना आमदार नीलेश लंके करीत असलेले काम शरद पवारांच्या धोरणानुसार !

 समाज अडचणीत असताना आमदार नीलेश लंके करीत असलेले काम शरद पवारांच्या धोरणानुसार !

राष्ट्रवादी विद्यार्थी युवती काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहान यांचे प्रतिपादन !नगरी दवंडी

पारनेर प्रतिनिधी :

जेव्हा समाज अडचणीत असतो त्यावेळी राजकारण नव्हे तर माणुसकीच्या भावनेतून समाजासाठी काम करायचे असते या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेशी सुसंगत काम आमदार नीलेश लंके करीत आहेत असे प्रतिपादन राष्ट्रवादी विद्यार्थी युवती काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहान यांनी केले.

          आमदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या  शरदचंद्रजी पवार  आरोग्य मंदिरास सोनीया दुहान यांनी भेट दिली यावेळी त्या बोलत होत्या.आमदार लंके यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे,महाराष्ट्र प्रदेश प्रभारी सनी मानकर ,पश्चिम महाराष्ट्र प्रमुख सुहास कदम,कोकण विभाग प्रमुख किरणजी शिखरे ,पुणे विभागाचे अध्यक्षा संध्याताई सोनवणे , मराठवाडा अध्यक्ष प्रशांत कदम,कृषि विभाग प्रमुख विनोद भांगे , प्रदेश संघटक कुंदन काळे,जिल्हाध्यक्ष गजुभाऊ भांडवलकर, कार्याध्यक्ष विशाल म्हस्के,युवती जिल्हाध्यक्ष राजेश्वरी कोठावळे,निलेश लंके प्रतिष्ठान युवक अध्यक्ष विजुभाऊ औटी,डॉ.गंधे सर , तालुकाध्यक्ष शाहबाज शेख , पै.पवन कुमटकर , राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          सोनिया दुहान म्हणाल्या की,ऐशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अंगीकारलेल्या तत्त्वावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा आहे.करोना संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर आमदार नीलेश लंके १०० टक्के समाजकारण करीत आहेत.करोनाबाधित रुग्णांजवळ त्यांचे कुटुंबीय येण्यास धजावत नाहीत.मुले आपल्या आई-वडिलांना उपचारासाठी कोविड उपचार केंद्रात दाखल करुन निघून जातात.पुन्हा साधी चौकशी करण्याची तसदी घेत नाहीत.या पार्श्र्वभूमीवर आमदार नीलेश लंके रुग्णांची कुटुंबीय घेणार नाहीत एवढी काळजी घेत आहेत.त्यांच्याबरोबर जेवण घेत आहेत.येथेच झोपत आहेत.आमदार लंकेे यांच्या या सेवेची महती हरियाणाच्या ग्रामीण भागात पोहचली आहे‌.तेथील जनतेपर्यंत आमदार नीलेश लंकेंचे काम पोहचले आहे.आमच्या राज्यात आरोग्य सुविधांची स्थिती बिकट आहे.त्या ठिकाणी आम्हाला आमदार नीलेश लंके यांच्या प्रमाणे काम करायचे आहे.एवढे मोठे काम आम्हाला करता येणार नाही.परंतू जेव्हढी शक्य आहे तेव्हढी रुग्णसेवा आम्ही करणार आहोत.आमदार लंकेे यांच्या कामाची,करोना उपचार केंद्रातील व्यवस्थापनाची, सुविधांची माहिती घेण्यासाठी आपण हरियाणातून आलो असल्याचे दुहान म्हणाल्या.आमदार लंके यांच्या कामाची माहिती प्रसारमाध्यमांतून हरीयाणाच्या ग्रामीण भागातील तरुणांना झाली आहे.ते त्यांच्या कामावर फिदा झाले आहेत.आमदार लंकेे यांचे काम पाहून आपण प्रभावीत झालो आहोत.समाजाची काळजी घेणारा एक चांगला भाऊ आपणास मिळाला असल्याचा आनंद वाटतो असे दुहान म्हणाल्या.

जादू की झप्पी'

भाळवणी येथील शरदचंद्र पवार आरोग्य मंदीरात दाखल झालेल्या रुग्णांना आरोग्य सुविधेसह,राहणे,जेवण नाष्टा आदी सुविधा तर मिळतातच पण त्याचबरोबर रुग्णांना दररोज आमदार लंके यांची 'जादू की झप्पी' मिळते.त्यातून रुग्णांना धीर मिळतो. आत्मविश्वास निर्माण होतो.रुग्ण अपेक्षेपेक्षा कमी वेळेत करोनामुक्त होऊन घरी परततो.ही आमदार लंके यांची किमया आहे.

सोनिया दुहान, राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी युवती काँग्रेस

जितेश सरडे यांचे मोलाचे योगदान

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची ध्येय धोरणे, विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे काम सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यात विद्यार्थी शाखेचे माहिती तंत्रज्ञान प्रमुख जितेश सरडे मोलाची भूमिका बजावत आहेत.सध्या समाज माध्यमांचा, माहिती तंत्रज्ञानाचा जमाना आहे.आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे याचे श्रेय निश्चितच जितेश सरडे यांच्या कामाला आहे.असे गौरवोदगार सोनिया दुहान यांनी काढले.

हरियाणातील माझ्या गावात प्राथमिक आरोग्य सुविधा देखील नाहीत

हरियाणातील माझ्या २०-२२ हजार लोकसंख्या असलेल्या गावात प्राथमिक स्वरुपाच्या आरोग्य सुविधा नाहीत.डॉक्टर नाहीत.तेथे करोना संसर्गाच्या तपासण्या केल्या जात नाहीत.दररोज चार पाच व्यक्तींचे मृत्यू होत आहेत.हे भिषण वास्तव सोनिया दुहान यांनी यावेळी मांडले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here